पेंढरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या सिखे च्या प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गोष्टीच्या पुस्तकांचे प्रकाशन ; शाळेत रंगला प्रकाशन सोहळा.

 


पेंढरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या सिखे च्या प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गोष्टीच्या पुस्तकांचे प्रकाशन ; शाळेत रंगला प्रकाशन सोहळा.


एस.के.24 तास


धानोरा : पेंढरी केंद्रातील केंद्र शाळा पेंढरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेल्या सिखेच्या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या गोष्टीच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा आनंद घेतला.

   


गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात सिखे फाऊंडेशन मुंबई, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा शिक्षण विभाग गडचिरोली यांच्या संयुक्त माध्यमाने TIP (Teacher Innovator Programm) सन 2021 पासून सुरू आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विविध भाषा विषयाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. सन 2023-24 या सत्रात विद्यार्थ्यांना कथा कशी लिहायची, त्यामध्ये कोणकोणते घटक असतात, त्या सर्व घटकांचा गोष्टीमध्ये काय गरज आहे, चित्रावरून गोष्ट कशी तयार करायची, गोष्टीमधील विविध घटक कसे ओळखायचे, आपल्या गोष्टीचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ तयार करणे याबाबत प्रत्येक शाळेमध्ये उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना शिक्षकांद्वारे शिकवण देण्यात आली. 

     

सदर उपक्रमाच्या अनुषंगाने पेंढरी केंद्रातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये प्रदर्शणीचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वि चे सर्व विद्यार्थी सहभागी झालेले होते. शाळेमध्ये भरलेल्या प्रदर्शनी ला पेंढरी केंद्राचे केंद्रप्रमुख मंसाराम मेश्राम तसेच शाळेचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य,माता-पालक वर्ग त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका पुष्पा येरमे, संध्या येरमे यांनी उपस्थित राहून मुलांच्या लिहिलेल्या गोष्टी ऐकून त्यावर विद्यार्थ्यांसोबत चर्चा करून केलेले कार्य पाहून समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना विविध घटकांशी संबंधित प्रश्न विचारत होते व विद्यार्थी दिलेल्या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तराने सर्व समाधान व्यक्त करीत होते. तसेच विद्यार्थी आपल्या पालकांना पाहून खूप आनंदित दिसत होते.

     

सदर प्रदर्शनी वर्ष अखेरीस विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गोष्टी, चित्रे यांची होती. आपण स्वतः लिहिलेल्या गोष्टी विद्यार्थी पालकांना सांगत होते. 

   

प्रदर्शनीला सुरुवात करण्यापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढून प्रदर्शनीला येण्याचे गावातील लोकांना, आपल्या पालकांना आमंत्रित करीत होते. या प्रदर्शनीला सिखेचे जिल्हा समन्वयक संदीप पाटील, सिखेचे पेंढरी व दुर्गापूर केंद्राचे मार्गदर्शक धनराज कोहळे यांनी सहकार्य केले. प्रदर्शणीचे उदघाटन इयत्ता पाचवी चे आराध्या कोटरंगे व भवेश मरई यांच्या हस्ते करण्यात आले. 


तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी च्या मुख्याध्यापिका सुरेखा शेडमाके, सहायक शिक्षक कलीराम हलामी, जगमत देहारी, प्रभाकर येरमे तसेच शिक्षिका सावित्री उईके हजर होते. यामध्ये TIP शिक्षक कलीराम हलामी यांनी वर्षभरात TIP च्या माध्यमातून शाळेमध्ये राबविलेल्या सर्व कार्याची माहिती दिली. तसेच शाखेतील TIP शिक्षक यांनी प्रदर्शनी लावून विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या नवनवीन कथा एकूण पालक सुध्या आनंदित झाले.

    

कार्यक्रमाचे संचालन सावित्री उईके यांनी तर प्रास्ताविक TIP मार्गदर्शक धनराज कोहळे यांनी केले. शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !