कॅन्सरग्रस्त रुग्णाला विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत. ★ विजयकिरण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम.

कॅन्सरग्रस्त रुग्णाला विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत.


★ विजयकिरण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम.


एस.के.24 तास


सावली : दिनांक : १८फेब्रुवारी २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनतर्फे राजोली फाल येथील कॅन्सरग्रस्त महिलेस,सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी सरपंच मा.शामराव बाबनवाडे यांच्यावतीने आर्थिक मदत देण्यात आली.


मौजा.राजोली फाल गावातील कॅन्सरग्रस्त रुग्ण वनिताबाई परचाके वय ५० वर्षे ह्या घरातील कर्तबगार कुटुंब प्रमुख महिला असून बऱ्याच दिवसापासून प्राथमिक उपचार करीत होत्या परंतु वारंवार त्यांना अस्वस्थ जाणवत होते,उपचारदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले घरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पूढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांना मिळाली तात्काळ त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.


सदर आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,माजी सरपंच मा.शामराव बाबनवाडे,पोलीस पाटील मा.बंडू बाबनवाडे,चकपिरंजीचे उपसरपंच मा.अरविंद भैसारे,मा.मोरेश्वर बाबनवाडे,मा.बंडू घोगरे, कौशल्याबाई  कन्नाके आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !