दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात देशातील सर्व शेतकऱ्यांनी एकवटले पाहिजे. - भूमिपुत्र ब्रिगेड

दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात  देशातील सर्व शेतकऱ्यांनी एकवटले पाहिजे. - भूमिपुत्र ब्रिगेड


ममता गोजे - शहर प्रतिनिधी


मुल - दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या चांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भूमिपुत्र ब्रिगेड तर्फे आज माननीय तहसीलदार मुल यांना डॉ.राकेश गावतुरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.


आपला देश भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि कृषी हा येथील अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख पाया आहे. येथील जनतेला महत्त्वा ची गरज म्हणजे अन्नधान्य निर्माण करण्याचे  काम शेतकरी करत असतो. आम्ही अभिमानाने म्हणतो की शेतकरी या देशाचा राजा आहे पण वास्तविक शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय हलाकीची होत चालली आहे. या भारतातील प्रत्येक उत्पादकाला त्याने उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार आहे ज्यातून तो नफा कमवीत असतो पण शेतकरी या गोष्टीसाठी अपवाद आहे .शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही आहे. म्हणूनच त्याच्या शेतमालाला कमीत कमी किमान समर्थन मूल्य (msp )  देण्याची अत्यंत निकटीची गरज आहे.


किंबहुना तो शेतकऱ्याचा हक्कच आहे. शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि शेतीची आणि शेतकऱ्यांची प्रगती व्हावी या उद्देशाने स्वाभिनाथन आयोग काढला गेला पण त्या स्वामीनाथन आयोगाच्या एकही शिफारशी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षापासून या सरकारने लागू केल्या नाहीत. आतापर्यंत शेतकऱ्याला त्याची हक्क तर दिलेच नाही याउलट गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्याला व शेतीला बरबाद करण्याचा कार्यक्रम चालू आहे. नुकताच दोन वर्षांपूर्वी शेतीविरोधी तीन  काळे कायदे केंद्र सरकारने लागू केले होते.


पण पंजाब ,हरियाणा या भागातील शेतकऱ्यांनी जीवाची बाजी लावून, अनेक दिवस संघर्ष करून ते शेतकरी विषयक काळे कायदे मागे घेण्यासाठी सरकारला भाग पाडले. यावेळेस पुन्हा शेतकऱ्याला किमान समर्थ मूल्य मिळावे या मागणीसाठी दिल्ली येथील रस्त्यावर आसपासच्या प्रदेशातील शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केले. मागणी काय तर फक्त आमच्या शेतकऱ्याला योग्य तो हमीभाव देण्यात यावा पण केंद्र सरकार सातत्याने शेतकऱ्याची पिळव नुक करत आहे. 


दिल्ली येथील जंतर मंतर या मैदानावर शेतकऱ्यांना एकत्रित येऊ द्यायचे नाही या यासाठी  रस्त्यामध्ये खिळे ठोकले आहेत. संविधानिक दृष्ट्या चालू असलेल्या या आंदोलनावर केंद्र सरकार द्वारा विविध पोलीस व  निमलष्करी र दलाचा वापर करून त्यांच्यावर अश्रुदार गोडे फेकून या शेतकऱ्यांना पांगवण्याचा व शेतकऱ्याची हक्काचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे.


ज्या पद्धतीने शेतकऱ्यावर अमानवी अत्याचार चालू आहे जसेकी  शेतकरी म्हणजे आतंकवादीच आहे. शेतकऱ्याचा बजेट भांडवल दाराच्या  घशात टाकून शेतकऱ्यांना बरबाद करण्याचा कार्यक्रम या विद्यमान केंद्र सरकार द्वारे या भारतात सुरू आहे. आणि कुठल्याही प्रकारच्या या भांडवलदर धार्जिणा  या मीडिया द्वारे हे सामान्य जनतेपर्यंत दाखविल्या जात नाही आहे.


त्यामुळे भारतातल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित केलेल्या शेतमालाला किमान समर्थन मूल्य एम एस पी मिळावी आणि शेतकरी गुण्यागोविंदाने जगला पाहिजे या गोष्टीसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या त्यांच्या हक्काच्या आंदोलनासाठी आम्ही भूमिपुत्र ब्रिगेड जिल्हा चंद्रपूर द्वारे जाहीर समर्थन करतो तसेच आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांना त्याच्या हक्क अधिकार मिळाले पाहिजे.स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या पाहिजे असे निवेदन दिले.


यावेळी प्रांताध्यक्ष डॉ.समीर कदम मुल शहराध्यक्ष,नितेश मॅकलवार,चांगदेव केमेकर सरपंच,विनोद निमगडे, राकेश मोहुर्ले सागर कांबळी, सचिन आंबेकर आकाश आरेवार, सागर आऊलवार, अतुल मडावी शुभम कावळे ,शशांक लांडे इत्यादी कार्यकर्ते हजर होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !