माॅ.दुर्गा मंदिर मुल सामाजिक सभागृहाचा लोकार्पण विरोधी पक्ष नेते,नाम विजय भाऊ वडेट्टीवार हस्ते.

माॅ.दुर्गा मंदिर मुल सामाजिक सभागृहाचा लोकार्पण विरोधी पक्ष नेते,नाम विजय भाऊ वडेट्टीवार हस्ते.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : जिल्हा खनिज विकास निधी व खासदार स्थानिक विकास निधी मधून बांधकाम करण्यात आलेल्या माॅ दुर्गा मंदिर सामाजिक सभागृहाचा  लोकार्पण करताना विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नाम विजय भाऊ वडेट्टीवार यांनी अभिवचन दिले.लोकार्पण सोहळ्याचे अध्यक्ष मंदिर सर मंदिर समितीचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंग रावत प्रमुख अतिथी गडचिरोली जिल्हा माजी आमदार डॉक्टर नामदेवराव उसेडी गडचिरोली जिल्हा,महेंद्र बाबनवाडे डॉ.नामदेव किरसान व 


जेष्ठ कार्यकर्ते जिलानी प्राचार्य देविदास जगनाडे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश भाऊ रत्नावार  सिंदेवाही चे नगराध्यक्ष स्वप्नील कावळे माजी सभापती व संचालक घनश्याम भाऊ येनुरकर माजी नगरसेवक नंदू जी नागरकर चंद्रपूर माजी नगराध्यक्ष विजय भाऊ चिंबलवार मूळ साबा उपविभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले माझी महापौर वसंता देशमुख आदी मान्यवर उपस्थित होत


जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती नामदार विजय  वडेट्टीवार यांना केली असता तात्काळ निधी उपलब्ध करून दिल्याने हे सभागृह साकारल्याचे मत मंदिर समितीचे अध्यक्ष संतोष सिंग रावत यांनी व्यक्त केले.


 कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती राकेश रत्नावर यांनी मंदिर बांधत असताना अनेक अडचणी आल्या परंतु मातेच्या आशीर्वादाने व विजय भाऊच्या सहकार्याने अडचणी दूर झाल्याचे सांगितले कार्यक्रमाचे संचालन मंदिर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन मंदिर समितीचे सदस्य गुरुदास भाऊ गुणुले काँग्रेस मुल तालुका अध्यक्ष यांनी मानली यांनी मांडली.


कार्यक्रमानंतर विजय वडेट्टीवार यांचे हस्ते मुल तालुका काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने नियुक्ती केलेल्या सर्व सेलचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष सचिव यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !