अशोक चव्हाण च्या पक्षांतराव ; एक व्यक्ती गेला म्हणजे पूर्ण पक्ष अस्थिर झाला असं समजण्याचा कारण नाही. - विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार
एस.के.24 तास
नागपूर : राजकारणात पक्षात बदल होत असतात एक व्यक्ती गेली म्हणजे पूर्ण पक्ष अस्थिर झाला असं समजण्याचा कारण नाही नक्कीच नाही… या परिस्थितीतून काँग्रेस नव्याने उभारी घेईल आणि पक्ष मजबुतीने उभा राहील,असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. माझ्या संदर्भात काही जण वावड्या उठवत आहे. आ. रवी राणाची प्रवृत्ती एकनिष्ठतेची नाही.अशी टीका त्यांनी केली काँग्रेस पक्षाने खूप काही दिले आहे शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये राहणार असे वडेट्टीवार म्हणाले.
अशोक चव्हाण यांच्याशी स्नेहाचे संबंध आहे. मुंबईची इंडियाची आघाडीची बैठक असेल नागपूरला असलेली काँग्रेसची सभा असो आम्ही खांद्यावर घेऊन काम केलेला आहे संबंध आणि विचारधारा वेगळी आहे. असेही ते म्हणाले.
अशोक चव्हाण यांचा मागे केंद्रीय एजन्सीचा ससेमिरा लावण्याचा काम सुरू झालं होतं. हे नाकारून चालत नाही भाजप चारशे पार चा नारा देत असताना दुसऱ्याचे नेते का पडत आहे यांना यांच्यावरच विश्वास राहिला नाही. प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण झालं पण त्यातून काही साध्य झालं नाही.मात्र दुसऱ्याचे नेते पळवून नेण्याचे काम सुरू आहे. ते लोकांना मान्य होणार नाही.