अंकित ने गळफास घेऊन संपवली जीवन यात्रा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगाव दिनांक,१२ फेब्रुवारी २४ अंकित राजू लोखंडे अ-हेरनवरगांव याने काल सायंकाळी अंदाजे ५-३० वाजे दरम्यान आपल्या राहत्या घरी घराच्या छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तो अंदाजे २२ ते २४ वर्षाच्या आसपास होता.आई वडीलाला एकुलता एक असलेल्या अंकित ने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.अंकित चे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याच्यावर वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.