पात्र असूनही घरकुल योजने पासून डावलल्याने पंचायत समिती समोर बेमुदत संप.
★ भा.ज.पा.जिल्हा युवा मोर्चा सचिव सुरज किनेकार व ग्रा. पं.सदस्य.राकेश गोलेपल्लीवार यांनी ठिय्या आंदोलन स्थळी दिली भेट.
एस.के.24 तास
सावली : पात्र असूनही घरकुलापासून वंचित ठेवले असा आरोप करीत घरकुलाचा लाभ मिळावा, यासाठी जीबगाव येथील लाभार्थ्यांनी पंचायत समितीसमोर २२ फेब्रुवारीपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपा जिल्हा युवा मोर्चा सचिव सुरज किनेकार व ग्रा.प.सदस्य,राकेश गोलेपल्लीवार यांनी ठिय्या आंदोलन स्थळी भेट देत चर्चा केली.मात्र घरकुल मिळेपर्यंत आंदोलन सुरु ठेण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.
तालुक्यात मोदी आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागात घरकुलाचा लाभ देण्यात येत आहे. जीबगाव येथील दिलीप अशोक पाल व विलास उरकुडा नागापुरे यांना मोदी आवास योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला नाही. अग्रक्रमाने लाभ न देता वा कोणतीही घरकुलांची चौकशी न करता ग्रामपंचायत जीबगाव येथील सरपंच व सचिव यांनी संगमताने आम्ही पात्र असताना डावलले असून अपात्र लाभार्थ्यांना पात्र दाखविण्यात आल्याचा आरोप करीत सावली पंचायत समितीसमोर कुटुंबासह आंदोलन सुरु आहे. आंदोलन स्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा करून समजविण्याचा प्रयत्न केला तरी मात्र आंदोलन मागे घेणार नाही,जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही.
तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला. यासंदर्भात मा खासदार अशोक भाऊ नेते साहेब,माजी आमदार अतुल भाऊ देशकर साहेब यांना माहिती मिळताच त्यांनी दुरध्वनी द्वारे आंदोलन कर्त्याशी चर्चा करण्यात आली,पण आंदोलक आपली भुमिकेवर ठांब असल्याने,यासंदर्भात वरीष्ठ अधिकारी यांचेशी चर्चा करुन आपण आपल्या पाठीशी असु असे आश्वासन केले आहे.लवर प्रश्न निकाली काढण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले.
" आम्हाला कसल्याही प्रकारे विश्वासात न घेता परस्पर यादी तयार करून फेरफार करत असल्याने अपात्र व्यक्तींना घरकुल मंजूर करून पात्र गरजूना डावलण्यात आले आहे. याबाबतीत सरपंच,सचिव व पंचायत समितीचे अधिकारी यांनी गैरप्रकार केलेला असावा याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी.दोषी कर्मचारी व अधिकारी यांचेवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.- राकेश गोलेपल्लीवार सदस्य ग्रा.पं.जिबगाव