जेष्ठ पत्रकार तथा राज्य पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष,प्रा.महेश पानसे सर यांच्या वाढदिवस निमित्त...
★ अभीष्ट चिंतन व गौरव सोहळा ३ फेब्रुवारी २०२४ ला.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष,जेष्ट पत्रकार प्रा.महेश पानसे यांचे जन्मदिनी अभीष्ट चिंतन व याचे औचित्य साधून कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव सोहळा दि.३ फेब्रु. २०२४ ला राज्य पत्रकार संघ मुंबई तालुका शाखा मुल तर्फे आयोजित करण्यात आला आहे.
राज्यात पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे सर यांचा वाढदिवस दरवर्षी चंद्रपूर,गडचिरोली,नागपूर,भंडारा जिल्हयातील तालुका शाखा तर्फे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात येत असतो.
मुल तालुका शाखेने यंदा रूग्णांना फळे वाटप,वनीकरण,गरीब विदयार्थी यांना ब्लॅंकेट वाटप यासोबतच अभीष्ट चिंतन सोहळा व कार्यशील व्यक्तिमत्वांचा गौरव करुन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती तालूका अध्यक्ष,सतिष राजुरवार व जिल्हा पदाधिकारी ,मनिष रक्षमवार यांनी दिली आहे.
तहसिलदार डॉ.रवींद्र होळी,उपविभागीय अभियंता,प्रशांत वसुले,ठाणेदार,सुमित परतेकी,प्राचार्य,अशोक झाडें,जेष्ट पत्रकार,बाळूभाऊ भोयर,राजुरी स्टील इंडस्ट्री चे उपाध्यक्ष सुमित खेमका,युवा सामाजिक कार्यकर्ता,रुपेश पाटील यांचा सन्मान करण्यात येणार असून या कार्यक्रमास विशेष उपस्थितीत राज्य पत्रकार संघाचे विदर्भ उपाध्यक्ष,अनुपकुमार भार्गव,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,जितेंद्र चोरडिया, गडचिरोली जिल्हाधक्ष,रूपराज वाकोडे,नागपूर जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी चंदपूर जिल्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांचा ही सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती चंद्रपूर जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी दिली आहे.
सदर सोहळा एम.आय.डि.सी.परिसर मुल येथील स्टार हॉटेल येथे दुपारी २ वा.पार पडणार आहे.