राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यस्मरण सोहळा विरखल येथे संपन्न.
एस.के.24 तास
सावली : श्री.गुरुदेव सेवा मंडळ विरखल ता.सावली येथे राष्टूसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यस्मरण सोहळा पार पडला. याप्रसंगी ह.भ.प.फाले महाराज म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान सर्वासाठी व फायदयाचे आहे.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे मानव धर्म हि एकच जात आहे.जातीपातीचे बंधनं तोटून सर्वानी एकोप्याने राहावे.आपले गांव स्वच्छ ठेवून कसे सुंदर दिसेल याकडे लक्ष घ्यावे.
गोपाल रायपुरे म्हणाले की राष्ट्रसंताचे विचार अंगीकारणे महत्वाचे आहे. संताच्या विचार अंगी बाळगल्यास आपले शरीर शुद्ध होते. नेहमी मन प्रसन्न राहते. याप्रंसगी सरपंच मुक्तेश्वर आंभारे, मुखरु पाटिल निकुरे,मडावी सर,चुडीराम मुरांडे, मारोती पाटिल सहारे,विश्वनाथ गेडाम विहीरगाव,आदिनी राष्ट्रसंतांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
ध्वजारोहन पो.पाटिल आनंदराव गंडाटे यांचे हस्ते पार पडले. कार्यक्रमास केवळराम आत्राम, खोजींद्र नवघडे , उमाकांन्त गडांटे,नेताजी येलोरे,भगवान सहारे,भजभुजे , मोहन चिमुरकर,सहीत विरखल गावातील नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.