★ युवकांनी वाईट व्यसनापासून दूर राहावे व उच्च शिक्षित होऊन देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावावा. - नितीन गोहने
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील मौजा.व्याहाड खुर्द येथे वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५व्या पुण्यस्मरण सोहळ्या व तथा सर्व संत स्मृती मानवता दिनानिमित्य अभिवादनाचा कार्यक्रम जय हनुमाम गुरुदेव सेवा मंडळ,व्याहाड खुर्द व समस्त व्याहाड खुर्द वासीय जनतेतर्फे आयोजित करण्यात आला होता.प्रत्येक मानवाने आपले जीवन सुसंस्कारमय व आदर्शमय घडविण्यासाठी ब्रम्हलीन वंदनीय श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गित्ताचार्य तुकारामदादा यांच्या विचारांची देशाला अत्यंत आवश्यकता आहे.त्यासाठी राष्ट्रसंताचा ५५ वा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केलेला होता.
परीसरातील सर्व जनतेनी सहभागी होवून प्रबोधन व प्रवचन, भारूड, किर्तन इत्यादी कार्यक्रमाचा आवर्जुन लाभ घेतला, मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य केले.त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या पुनर्निर्माणासाठी फार मोठे योगदान आहे. तुकडोजी महाराज तत्वज्ञानात्मक फार होते. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल,अशी त्यांची धारणा होती.अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले.त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तसेच संत स्मृती मानवता दिनाचे औचित्य साधून पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.*
या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने, माजी सरपंच मा.केशव भरडकर, गाव काँग्रेस कमिटी मोखाडाचे अध्यक्ष अनिल मशाखेत्री, विविध कार्यकारी सेवा सोसायटी अध्यक्ष मा.दीपक जवादे, पुंडलिक मडावी ग्रामपंचायत सदस्य तथा अध्यक्ष जय हनुमान गुरुदेव सेवा मंडळ मा.हरिभाऊ चिवंडे माजी सरपंच तथा सदस्य, ह.भ.प किणेकर महाराज आवडगांव, गुलाब महाराज पाठोळा ,व्याहाड खुर्दच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.सुनिताताई उरकुडे, माजी पंचायत समिती सदस्या सौ.मनीषा जवादे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली मा.निखिल सुरमवार, मा. प्रशांत पाटील चिटनूरवार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सावली, मा.वामन चापले, मा.रवींद्र बोरकुटे
मा.योगनाथ मानकर,मा.गिरीधर कथले सदाशिव बाबनवाडे, प्रभाकर मलोडे, भक्तदास मडावी, जीवन नवघडे, गोकुळदास गेडाम, मुखरू पोहणकर, एकनाथ कांबळे, ईश्वर भरडकर, लक्ष्मण कांबळे, प्रभाकर पेंदाम, भगवान आभारे, वासुदेव मडावी, विजय बुर्लावार ,तसेच हनुमान देवस्थान कमेटी व समस्त व्याहाड खुर्द वासिय जनता मोठ्या संखेने उपस्थित होते.