चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन. ★ मागण्या पूर्ण झाल्यास 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन.

चंद्रपूर महावितरण कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन.


★ मागण्या पूर्ण झाल्यास 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन.


एस.के.24 तास


चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य भर कंत्राटी कामगारांचे आंदोलनाचे वारे पेटलेले चित्र दिसून येत आहेत अनेक वर्षापासून कंत्राटी कामगार शासन दरबारी आपल्या मागण्यासाठी अनेक आंदोलने पत्र व्यवहार करुन सुध्दा शासन व प्रशासन कंत्राटी कामगारांच्या मागण्या पुर्ण  करण्यास दुर्लक्ष करीत आहेत त्यामुळे महानिर्मिती,

महापारेषण व महावितरण कंपनीतील ३० संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र  वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती 2024 च्या मार्फत तिन्ही कंपनीतील कामगारांच्या प्रमुख मागण्यामध्ये पगार वाढ व (एन एम आर ) नॉमिनल मस्टर रोल पद्धती ने कामगारांना कंपनीत सामावून घेणे हरियाणा पॅटर्न प्रमाणे कंत्राटदार मुक्त रोजगार व अन्य १७ मागण्या करीता राज्यभरात सहा टप्प्यांमध्ये आंदोलनाचे दिशा ठरवण्यात आले.


त्यामध्ये पुढील पहिला टप्पा दि.९ फेब्रुवारी पासून  सुरू झाला व त्यामध्ये पाचवा टप्पा २८ फेब्रुवारी च्या मध्यरात्री च्या  00.00 वाजेपासून २९ फेब्रुवारी च्या मध्यरात्री 00.00 वाजेपर्यंत 48 तासा काम बंद धरणे आंदोलन 85 टक्के यशस्वी झाले आहे तसेच  दिनांक 29 फरवरी 2024 रोजी  95 टक्के काम बंद धरणे आंदोलन यशस्वी रित्या पार पडला असून संयुक्त कृती समितीला विश्वास आहे व अद्याप संपात सहभागी न झालेल्या कंत्राटी कामगारांना संयुक्त कृती समिती चंद्रपूर च्या वतीने आव्हान करित आहे.


की आपल्या न्याय हक्काच्या 17 मागण्या संदर्भात आंदोलनात सामिल झालेल्या संपूर्ण कंत्राटी कामगारांचे  संयुक्त कृती समिती ने संपूर्ण कंत्राटी कामगारांचे आभार मानले व शासन व प्रशासन यांनी मागण्या पूर्ण न केल्यास येत्या 5 मार्च रोजीला बेमुदत काम बंद आंदोलना चा ईशारा कृती समितीची वितीने करण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !