विश्वकर्मा पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल द्वारे 22 फेब्रुवारी ला जयंती महोत्सव मुल येथे विश्वकर्मा जयंती संपन्न.

विश्वकर्मा पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल द्वारे 22 फेब्रुवारी ला जयंती महोत्सव मुल येथे विश्वकर्मा जयंती संपन्न.


ममता गोजे - प्रतिनिधी


मुल : विश्वकर्मा पांचाळ समाज बहुउद्देशीय संस्था मुल द्वारे 22 फेब्रुवारी ला जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला.दुपारी 1 वाजता भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.     





या कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव जिरकुंटवार, प्रमुख अतिथी निलेश राय उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ता, गंगाधरराव यलचलवार, मधुकरराव शेंडे, संजय येरोजवार,रमेशराव पुल्लजवार ,मनोहरराव राजुरवार विजयराव वैरागडवार,रमेशराव चोप्पावार,अल्काताई राजमलवार      उपस्थीत होते.या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला., समाजाला भरभरून मदत केला बदल भास्करराव कत्रोजवार,सौ. सुमनताई कत्रोजवार , संदीप बदेलवार,सौ.रंजनाई बदेलवार यांचे शाल श्रीफळ व साळी चोळी देऊन सत्कार करण्यात आला, तसेच  पांचाळ समाजाच्या वतीने सचिव विजय वैरागडवार यांनी आभार मानले.


या कार्यक्रमात 10 वी 12 वी गुणवंत विद्यार्थी सत्कार, गितगायन स्पर्धा,नुत्य स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.या मध्ये प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक येणाऱ्या स्पर्धकांना सत्कार करुन प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.


या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बाबुराव गनलावार, विद्याधर मेडपल्लीवार, दिलीप कटलावार, विनायक कत्रोजवार, दत्तात्रय चिटलोजवार, एकनाथ गुंडोजवार  , राजेंद्र मेडपल्लीवार, संजय बदेलवार यांनी पुढाकार घेतला होता. कार्यक्रमाचे संचालन विलास यलचलवार,सौ. नंदाताई तासलवार,व आभार प्रदर्शन विक्की बोदगुलवार यांनी केले.यावेळी विश्वबाम्हण पांचाळ समाज बहु संख्येने उपस्थित होता.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !