जय शिवराय च्या जय घोषाने दुमदुमले जांब बुज. ★ शिवजयंती महोत्सव -२०२४ आपला उत्सव :आपली प्रेरणा' उपक्रम उत्साहात संपन्न.0

जय शिवराय च्या जय घोषाने दुमदुमले जांब बुज. 


★ शिवजयंती महोत्सव -२०२४ आपला उत्सव :आपली प्रेरणा' उपक्रम उत्साहात संपन्न.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


सावली : बाबासाहेबांनी संविधानातुन भारताला दिलेली लोकशाही ही मुळात छत्रपती शिवरायांच्या समतावादी राज्यकारभाराचीच प्रेरणा आहे. आणी म्हणूनच 'शिवराय ते भीमराय' हा वारसा जपत 'शिवजयंती महोत्सव-२०२४, आपला उत्सव :आपली प्रेरणा' हा उपक्रम नुकताच जांब बुज येथील युवकांच्या संघटनशील अशा अथक परिश्रमातुन संपन्न झाला.


बचत केलेल्या पैशातुन वाचनालयाची निर्मिती केल्यामुळे चर्चेत असलेले तालुक्यातील जांब  बुज. गाव पुन्हा एकदा 'संघटीत युवकांचा संघर्षशाली उपक्रम' म्हणून परिसरातील प्रत्येक शिवप्रेमिंच्या मनात अमिट ठसा निर्माण करताना दिसत आहे.


१९ फेब्रुवारी २०२४ , सोमवारला राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या पुढाकाराने लोक वर्गणीतुन गावात प्रथमच पहिला शिवजयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गावच्या प्रथम नागरिक सरपंच मा.सौ.वर्षाताई गेडाम तर उपाध्यक्ष स्थानी उपसरपंच मा.शामंत गायकवाड हे होते. तर या एक दिवशीय चाललेल्या विविध स्पर्धात्मक तथा मार्गदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन गावचे पोलिस पाटिल  मा.उमाकांत पा.चरडूके यांनी तर दिप प्रज्वलन मा.भास्कर पा. धानफोले सदस्य ग्रा.पं.यांनी केले. 


कार्यक्रमाच्या मार्गदर्शन सत्रासाठी मा.प्रा. इंजी.संजय मगर सर, ब्रम्हपुरी, मा.प्रा.डॉ.संतोष सुरडकर सर,जे.एन.यु.रिटर्न नवी दिल्ली,गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली,मा.प्रा.डॉ.रमाकांत गजभिये सर,नागपूर, मा.किनेकर सर,मुल उपस्थित होते तर प्रमुख मागदर्शक म्हणुन मा. देवेंद्र रायपूरे सर, गडचिरोली यांनी उपस्थित जन समुदायाला संबोधित केले. 


दरम्यान राजमाता जिजाऊ विचार मंचावर विशेष अतिथी म्हणुन मा.पुरुषोत्तम चुदरी सरपंच जिबगाव, मा. मनोज मेश्राम,सभापती शा. व्य. स.जांब बुज, मा. उरकुडे सर, जिबगाव,मा. गोरडवर सर, ग्रामसेवक, मा.डॉ.राहुल उंदिरवाडे उपाध्यक्ष बौ.स.,मा. रवींद्र शेंडे मा.नीलकंठ चुदरी, मा. राहुल सा. पडगेलवार, मा.भुजंगराव धनफोले, मा.डॉ. मिलिंद उंदिरवाडे हे उपस्थित होते.


बुद्ध,फुले,शाहु,आंबेडकर, शिवाजी महाराज विचारधारा प्रणित आयोजित या संपूर्ण  कार्यक्रमाची पार्श्वभूमी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष मा.चक्रपाणी जी निमगडे, अध्यक्ष तंटामुक्त समिती यांनी प्रास्ताविकेतुन मांडली.उत्सव समितीचे अध्यक्ष अंगुलिमाल उराड़े आणी कार्यकारणीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, सामान्य ज्ञान, सांस्कृतिक स्पर्धा इत्यादी शालेय स्तरावर आधारित विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.


कार्यक्रमाची सुरवात अनमोल भारतीय संविधान प्रस्तावनेच्या सामुहिक वाचनाने करण्यात आली तर 'एक गाव-एक शिवजयंती' हे ध्येय साकार करत गावात समता बंधुभाव प्रस्थापित करत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन संघरत्न निमगडे यांनी केले, तर या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करणाऱ्या समस्त गाव वासियांचे, युवकांचे रोहित उंदिरवाडे यांनी विचार मंचावरुन आभार मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !