T.E.E.N.S चे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी चा स्तुत्य उपक्रम.


T.E.E.N.S चे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न पोलिस स्टेशन ब्रम्हपुरी चा स्तुत्य उपक्रम.


एस.के.24 तास


ब्रम्हपुरी : दिनांक,२५/०१/२४ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक.) बालक देशाची संपत्ती आणि उद्याचे भविष्य मानले जाते. त्यांचे योग्य प्रकारे पालन पोषण ,संवर्धन व्हावे ,निकोप शारीरिक, मानसिक ,बौद्धिक आणि सामाजिक विकास व्हावा, बालकास अत्याचारापासून संरक्षण मिळावे, बालपण सुदृढ व्हावे ,बालकाच्या हक्काचे संरक्षण व्हावे, बालकाचे कोणत्याही प्रकारच्या शोषणापासून संरक्षण व्हावे या मुख्य हेतूने बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा 2012 

या नावाने केंद्र सरकारने बालकांच्या संवर्धनासाठी सन 2012 मध्ये विशेष कायदा पारित केला. स्त्रिया, मुले, मुलीवरील अन्याय,अत्याचार  दूर करण्यासाठी प्रभावी कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. या कायद्याची जनजागृती व्हावी विद्यार्थ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे वाढते सायबर गुन्हे लक्षात घेता सायबर सुरक्षा व उपाय योजना या विषयावर सुद्धा शाळा महाविद्यालयात सदर जागृती उपक्रम राबविले.


 तर विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये स्वसंरक्षणाबाबत आणि सायबर सुरक्षा, अमली पदार्थाचे दुष्परिणाम, वाहतूक नियमबाबत जागरूकता निर्माण होऊन निश्चितच वाढत्या गुन्ह्याचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. सदर बाबत जागृती उपक्रम हा शालेय महाविद्यालय, शिक्षकाकडून राबविल्यास त्याचा उत्तम प्रतिसाद विद्यार्थ्यांमध्ये मिळून येईल अशी संकल्पना आयुष नोपानी,सहा.पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांनी मांडल्याने रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी ,पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय चंद्रपूर, 


जिल्हा परिषद चंद्रपूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनच्या वतीने ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व शाळेतील प्रत्येकी एक शिक्षकासाठी तसेच ब्रह्मपुरी हद्दीतील पोलीस पाटील यांच्यासाठी एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन स्थानिक राजीव गांधी सभागृह येथे T.E.E.N.S.  (Teachers,Educating,Empowering &Nurturing Students)या एकदिवशीय शिक्षक पोलीस पाटील प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


 या कार्यक्रमाचे अध्यक्ष,दिनकर ठोसरे उपविभागीय पोलिस अधिकारी ब्रह्मपुरी,संजय पुरी गट विकास अधिकारी ब्रह्मपुरी,अनिल जिट्टावार  पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी,वैभव कोरवते  सहाय्यक पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी,खुणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती ब्रम्हपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच  सुमित जोशी सचिव जिल्हा विधि सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर चंद्रपूर,रोशन इरपाचे कम्युनिटी सेल चंद्रपूर, मुजावर अली सायबर सेल चंद्रपूर हे मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने उपस्थित होते.


सदर प्रशिक्षण शिबीर कार्यक्रमातून अनिल जिट्टावार पोलीस निरीक्षक ब्रम्हपुरी  यांनी आपले प्रास्ताविक मनोगतातून सदर प्रशिक्षण शिबिर हे रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून घेण्यात आले असून शिबिर घेण्याचा उद्देश हा शिक्षकांना लैंगिक गुन्ह्यापासून बालकाचे संरक्षण कायदा- 2012 सायबर गुन्हे व उपायोजना, अमली पदार्थाचे दुष्परिणाम व उपाय योजना बालकांचे मानसशास्त्र आणि शिक्षकांची समस्या विविध विषयावर  पोलीस विभाग,जिल्हा परिषद चंद्रपूर


 आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने हा अभिनव प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. प्रत्येक शिक्षकांनी या प्रशिक्षणातून  प्रशिक्षित होऊन आपापल्या गावात शाळेत महाविद्यालयातील मुला मुलींना तसेच गावातील नागरिकांना पालकांना  सविस्तर मार्गदर्शन करण्याबाबत उपस्थित शिक्षकांना तसेच पोलीस पाटलांना आवाहन केले. तर प्रमुख मार्गदर्शक सुमित जोशी यांनी पावरपॉइंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून पोक्सो गुन्हे, लैंगिक गुन्हापासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ 


या कायद्यातील विविध तरतुदी,बाल विवाह कायदा,तसेच १८वर्षाखालील मुले मुली,तृतीयपंथी यांना गुड टच बॅड तच  याबाबत माहिती देऊन या कायद्यामुळे होणारी शिक्षा त्याचे होणारे परिणाम याची प्रशिक्षणासाठी उपस्थित शिक्षक पोलिस पाटील यांना साध्या सोप्या भाषेत उदाहरण देऊन मार्गदर्शन केले. रोशन इरपाचे कम्युनिटी सेल चंद्रपूर व मुजावर अली सायबर सेल चंद्रपूर यांनी सायबर गुन्हे व  त्यावरील उपायोजना याबाबत पावरपॉइंट प्रेझेंटेशन व व्हिडिओ दाखवून सायबर युगातील धोके व त्याची उपाय योजना.


याबाबत सविस्तर माहिती देऊन शिक्षकांना शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षणा दरम्यान इंटरनेट,मोबाईलच्या केलेल्या दुरुपयोगाचे दुष्परिणाम याबाबत घडलेल्या गुन्ह्याची उदाहरणे देऊन शालेय महाविद्यालयीन जीवनात मोबाईल तंत्रज्ञानाचा सदुपयोग करून आपले जीवन कसे साध्य करता येईल याबाबत करावयाची उपायोजना याबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन  करून शिक्षकांनी पोलिस पाटलांनी आपापल्या स्तरावरून इतरांनाही मार्गदर्शन करावे असे आवाहन केले.


सदर कार्यक्रमात जिल्हा परिषद अखत्यारीतील सर्व खाजगी माध्यमिक शाळेतील १६१ शिक्षक उपस्थित होते .तसेच प्रमुख तालुक्यातील ७० पोलीस पाटील तसेच पोलीस स्टेशन येथील अधिकारी अमलदार असे एकूण 250 प्रतिनिधी उपस्थित होते.शिक्षकाचे फीडबॅक घेतले असता त्यांनी सदर प्रश्न त्यांना व त्यांची शालेय विद्यार्थ्यांना पोस्को गुन्हे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा याबाबत तसेच सायबर सुरक्षा बाबत जागृत करण्यावर उत्तम माहिती प्राप्त झाल्याचे सांगून त्यांचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना होइल अशी शाश्वती दिली.  


सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अनिल जिट्टावार पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी यांनी केले असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रशांत डांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन  पद्माकर रामटेके  यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी  पोलीस हवालदार अरुण पिसे ,पोलीस हवालदार राहुल लाखे,पोलीस अंमलदार नरेश कोडापे यांनी सहकार्य केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !