मुख्याध्यापक देवानंद तुर्काने यांचा अनोखा उपक्रम ; शाळेतील विद्यार्थिनीला दिला झेंडा फडकविण्याचा बहुमान.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,२६/०१/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) ७५ व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अ-हेरनवरगाव चे कृतिशील मुख्याध्यापक श्री देवानंद तुरकाने सर यांनी गणराज्य दिनाचा ध्वजारोहण विद्यालयातील हुशार व होतकरू विद्यार्थिनी कुमारी कीर्ती रामपाल तुपट वर्ग चौथा हिच्या हस्ते करून गावात व विद्यालयात ध्वजारोहणाच्या नवीन पर्वाला सुरुवात केली.
विद्यार्थिनीच्या हस्ते राष्ट्रीय कार्यक्रमाचा ध्वजारोहण करणारा हा पहिलाच कार्यक्रम.कीर्ती तुपट ने ध्वजारोहण करताच उपस्थित सर्व गावातील प्रतिष्ठित मान्यवर मंडळी,अंगणवाडी कर्मचारी यांनी कौतुकाने तिची पाठ थोपाटून अभिनंदन केले.
जिल्हा परिषद शाळेतील ध्वजारोहण आटोपून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि विकास विद्यालय, अ-हेरनवरगाव विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षिका आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक, निमंत्रित पाहुणे, ग्रामपंचायत सचिव रतिरामजी चौधरी,उपसरपंच जितुभाऊ क-हाडे ग्रामपंचायत सदस्य गण,गावकरी,आबाल वृद्ध ,तरुण-तरुणाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंचा सौ. दामिनी ताई चौधरी यांनी ध्वजारोहण केल्यानंतर दोन्ही शाळेच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय पटांगणात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या सांस्कृतिक कार्यक्रमात एका पेक्षा एक सरस नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले.
परंतु जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले दोनच राजे इथे जन्मले या गाण्यावर केलेल्या नृत्याला उपस्थित प्रेक्षकांनी प्रचंड भरघोस प्रतिसाद देऊन सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि भविष्यात यापेक्षाही उत्कृष्टपणे कोणत्याही गाण्यावरती सादरीकरण करण्याच्या शुभेच्छा दिल्या.