वरोरा तालुक्यातील वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत मौजा वाघोली येथे मोराची शिकार ; आरोपीना अटक.

वरोरा तालुक्यातील वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत मौजा वाघोली येथे मोराची शिकार ; आरोपीना अटक.


एस.के.24 तास


वरोरा : तालुक्यातील वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत मौजा वाघोली येथे मोराची शिकार झाल्याची गुप्त माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांना मिळाली.सदर घटना 15 जानेवारी 2024 ला दु.3 वाजताचे दरम्यान ची आहे.


गुप्त माहितीचे आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी वनकर्मचारी क्षेत्र सहायक शेगाव,जे.के.लोणकर, डी.बी.चांभारे,वनरक्षक चंदेल,लडके, बोढे यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता आरोपी नामे विलास आडकू नन्नावरे रा.वाघोली वय 42 वर्ष ,संयुक्त वनव्यवस्थापन समिती वाघोली अध्यक्ष, रामदास वामन जीवतोडे रा.वाघोली,वय 34 वर्ष,दिगांबर तुळशीराम गजभे रा.वाघोली वय 33 वर्ष,या आरोपीं जवळ 

मोराचे 3.100 ग्रॅम मास,लोखंडी सुरा 1 नग, लोखंडी हुक 1 नग,मोराचे पाय 4 नग,मोराचे पंख व औषधी टाकलेले धान्य 1 किलो असा मुद्देमाल आढळून आला.साहित्य जप्त करण्यात आले असून त्यांच्या वर प्रा.अ.सु.क्र.09169/229205 दि.15/2/2024 भारतीय वन्यजीव सरंक्षण अधिनियम 1972 चे कलम 9,51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

पुढील चौकशी विभागीय वनाधिकारी चंद्रपूर प्रशांत खाडे,सहायक वन संरक्षक (तेंदू)अतिरिक्त चंद्रपूर विभाग चंद्रपूर घनश्याम नायगमकर यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा, सतीश शेंडे,क्षेत्र सहा.शेगाव जितेंद्र लोणकर,क्षेत्र सहा.टेमुर्डा दिवाकर चांभारे,वनरक्षक मेसा चंदेल,वनरक्षक साखरा लडके,वनरक्षक शेगाव बोटे,वनरक्षक वरोरा तिखट वनरक्षक नेवारे आजनगाव करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !