सावली येथे विनामूल्य मोतीबिंदू तपासणी व भिंगारौपण शस्त्रक्रिया शिबिर ; महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली चा उपक्रम.
एस.के.24 तास
सावली : सेवाग्राम मेडिकल कॉलेज सेवाग्राम,आरोग्य विभाग चंद्रपूर, यांचे संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली द्वारा दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोज रविवार
सदर शिबिरात निवडलेल्या रुग्णांची मोफत भिंगारोपण शस्त्रक्रिया सोमवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२४रोजी सेवाग्राम येथील मेडिकल कॉलेजच्या नेत्र तज्ञांच्या हस्ते होणार आहे. शिबिराला प्रमुख मार्गदर्शन म्हणून डॉ.शुक्ला,डॉ.देवानंद,एन.सी.भंडारी,इंजिनियर दिलीप भंडारी,वीर त्रिशुल बंब,सौ लता वर्मा, विभागीय अध्यक्ष प्रकाश खजांची,तालुका अध्यक्ष,मनोज ताटकोंडावार, सचिव राहुल मेरुगवार यांचे मुख्य मार्गदर्शन लाभणार आहे.
रुग्णांनी येताना सोबत आधार कार्ड,रेशन कार्ड,वोटिंग कार्ड यापैकी कोणतेही एक कागदपत्र सोबत आणावे तसेच कोविड -१९ च्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक आहे.
" मानव सेवा हीच ईश्वर सेवा "
हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून मागील सोळा वर्षापासून महावीर इंटरनॅशनल सावली तर्फे हे सामाजिक उपक्रम राबवत असून आज पर्यंत हजारो रुग्णांनी विनामूल्य डोळे तपासणी शिबिर तसेच कृत्रिम भिंगारोपण मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आयोजित विनामूल्य डोळे तपासणी शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा असे आवाहन महावीर इंटरनॅशनल सेंटर सावली च्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात येत आहे.
हि माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी शेअर करावे...