कळमना येथे समाजसेवकाच्या हस्ते ध्वजारोहण : सरपंच,नंदकिशोर वाढई यांचा कौतुकास्पद उपक्रम.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच नंदकिशोर वाढई यांनी आपला ध्वजारोहणाचा मान कळमना येथील समाजसेवक डॉ.भिवसन पाटील चिंचोलकर यांना दिला.एवढेच नव्हे तर भिवसन पाटील चिंचोलकर यांना कळमना ग्राम सभेने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.अशा समाजसेवक व्यक्तीला सन्मान देऊन कळमना येथे ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ.भा.सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महापुरुषांच्या बलिदानातून भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे आणि २६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक अस्तित्वात आले आहे. गावातील व परिसरातील जनतेला निःशुल्क सेवा देऊन प्रेरणादायी कार्य करणारे कळमना येथील समाजसेवक डॉ. भिवसन पाटील चिंचोलकर यांना त्यामुळेच प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणाचा मान मी दिला आहे. याचा मला खूप आनंद व अभिमान आहे.
या प्रसंगी बाळकृष्ण पिंगे पोलीस पाटील कळमना,कौशल्य मनोहर कावळे उपसरपच कळमना,ग्राम पंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, सुनिता उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, नुतन आत्राम माजी सरपंच, ग्रामसेवक मरापे, मुख्यध्यापक दुधे मडम, भाऊजी पाटील वाढई माजी पोलीस पाटील, माजी उपसरपंच महादेव ताजणे, गुरुदेव सेवा मंडळाचे सचिव दत्ताजी पिंपळशेळे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर, गौखरे मॅडम, उमरे सर, पेदोर सर, जेष्ठ नागरिक आनंदराव बोढाले, बापुजी पाटील वाढई, सामाजिक कार्यकर्ता कवडु गौरकार, मारोती बल्की
सुरेश गौरकार, सुरेश कावळे, शंकर गेडाम, देवानंद आबिलकर,अनिल बोढाले,शंकर फिसके,क्षावण गेडाम,संगीता उमाटे,सुचिता धांडे,मंदा गेडाम, युवक वर्ग मारोती सपाट,विनायक धांडे,विजय मुठलकर,प्रविण वाढई,सुरेश आत्राम,मारोती टेकाम,अंकुश सपाट, शिपाई सुनील मेश्राम,विशाल नागोसे, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी,गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व बचत गटाच्या महिला मंडळ यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.