बसपा सुप्रीमो मायावती यांचा वाढदिवस जनकल्याणकारी दिवस म्हणून साजरा.
★ राजुधोबी मेश्राम बसपाचे शहरअध्यक्ष नियुक्त.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : दिनांक,१५/०१/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री मायावतीजी यांचा ६८ वा वाढदिवस 'जनकल्याणकारी दिवस' म्हणून बसपा ब्रम्हपुरी विधानसभेच्या वतीने स्थानिक प्रबुद्ध बुद्धविहारात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष विधानसभा प्रभारी हिरामन मेश्राम हे होते.
प्रमुख मार्गदर्शक जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर बांबोळे,माजी प्रदेश सचिव सुशील वासनिक,प्रभारी नंदू खोब्रागडे,जेष्ठ कार्यकर्ता संघरक्षक डांगे,आर.जे.रामटेके,राजूधोबी मेश्राम आदी उपस्थित होते.
बहुजन समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी देशव्यापी आंदोलनाचे नाव बहुजन समाज पार्टी असून बहन मायावतीजींच्या नेतृत्वात देशाची तिसरी शक्ती निर्माण झाली आहे.मायावती यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत देशातील राजकारणात त्यांनी मोठी छाप निर्माण केली आहे.उत्तर प्रदेश सारख्या सर्वात मोठ्या राज्याचे चारवेळा मुख्यमंत्रीपद भूषवूनअनेक जनकल्यानाची कार्य करून कायदा सुव्यवस्था चोख करण्याचे महत्कार्य मायावतींनी केले.
देशभरात हे बहुजन समाजाचे आंदोलन मोठ्या प्रमाणात पोहचले असून बहुजन समाज पार्टी आणखी मजबूत करण्यासाठी यथोचित प्रयत्न करावेत,असे प्रतिपादन प्रभारी नंदू खोब्रागडे यांनी केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी मायावतींच्या जीवनावर प्रकाश टाकला.
सामाजिक परिवर्तनाची महानायिका लोह महिला मायावती यांना उपस्थितांनी केक कापून पुढील निरामयी आणि दीर्घायुष्याच्या मंगल शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी बसपाचे ब्रम्हपुरी शहर अध्यक्ष या पदावर राजुधोबी मेश्राम यांची नियुक्ती करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला ग्रामीण व शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन संजय बिंजवे यांनी केले तर आभार प्रभाकर उरकुडे यांनी मानले.