बोलोरो - टु व्हिलरचा चकपिरंजी जवळ भिषण अपघात विहीरगांवची महिला ठार.

बोलोरो - टु व्हिलरचा चकपिरंजी जवळ भिषण अपघात विहीरगांवची महिला ठार. 


एस.के.24 तास


सावली : चंद्रपूर ते सावली कडे जाणारी बोलोरो पिकअप चंद्रपूर वरून सावली कडे भरघाव वेगात जात होती. तर टु व्हिलर गाडी सुद्धा सावली कडे जात असतांना बोलारो पिकअप ने मागुन जोरदार धडक दिल्यामुळे चकपिरंजी जवळ भिषण अपघात घडला यात विहीरगांव बोरमाळा ची महिला जागीच ठार झाली. 


 दोघे गंभीर जखमी झाले.आज दि.22 जानेवारी 2024 सांयकाळी 7 :30 वा. चे दरम्यान आर.के.बार जवळ सार्वजनिक बांधकाम विभाग मुल डिव्हीजण कंपणी ची बोलोरो पिकअप मुळे अपघात घडलाअसल्याचे कळते. 

अपघात एवढा भिषण होता की बोलोरो गाडीच्या चंक्याने टु व्हिलर गाडीला पाचसे फुट भरकडत नेले.यात शोभा धारणे वय,49 वर्ष विहीरगांव ता.सावली हि जागीच ठार झाली.


  निखील गायकवाड विहीरगांव आणि धर्मा पाडुंरग गायकवाड विहीरगांव असे जखमीचे नावे असुन ते सुध्दा गंभीर जखमी असुन त्यांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे सावली पोलिसांनी भरती केले.शोभा हिला शवविच्छेदनासाठी दवाखाण्यात नेण्यात आले.तिच्या गळ्यात असलेला मंगळसुत्र गायब असल्याचे प्रत्यक्ष पाहणारे बोलत होते.चकपिरंजी जवळ बघ्याची गर्दी जमली होती.सदर घटनेचा तपास सावली पोलीस करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !