जिल्हा विधिसेवा प्राधिकरण तर्फे जेष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन ११ ला.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिस चे वतीने जेष्ठ नागरिक व उपस्थितांसाठी मार्गदर्शन दि. ११ जानेवारी २०२४ ला दुपारी १२ वाजता विरंगुळा केंद्र रामनगर गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण मुंबई याचे वरील संदर्भीय समान किमान कार्यक्रम सन २०२४ नुसार जिल्हा विधिसेवा प्राधिकरण गडचिरोली तर्फे राबविण्यात येत असुन सदर कार्यक्रमात आर.आर.पाटिल सचिव जिल्हा विधिसेवा प्राधिकरण गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली तर अँड.संजय भट मुख्य लोक अभिरक्षक गडचिरोली यांचे उपस्थितीत जेष्ठ नागरिकासाठी मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्य लिपीक एन.आर.भलवे लेखपाल बुरांडे करीत असुन जेष्ठ नागरिकांनी व उपस्थितांनी सदर मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा विधिसेव प्राधिकरण गडचिरोली तर्फे करण्यात आलेले आहे.