काँग्रेस कार्यालयात हुतात्मा दिनानिमित्त म.गांधींना विनम्र अभिवादन.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,३० जानेवारी २०२४ मोहनदास करमचंद गांधी हे भारताला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर नेणाऱ्या प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते.स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. गांधी स्मृतीमध्ये नथुराम गोडसेने बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी प्रार्थनेला जाताना गांधींवर गोळ्या झाडल्या.
या दिवसाची इतिहासात गांधीजींची पुण्यतिथी म्हणून कायमची नोंद झाली आहे.बापूंची पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करून राष्ट्रपिता महात्मा गांधींना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अभिवादन करते समयी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार, उपंगराध्यक्ष मा.संदीप पुण्यपकार,सावली शहर युवा अध्यक्ष मा.अमरदीप कोणपत्तीवार,बांधकाम सभापती सौ.साधनाताई वाढई, पाणी पुरवठा,स्वच्छता व आरोग्य सभापती,बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,बोथलीचे उपसरपंच मा.विजय गड्डमवार,मा.आकाश येणप्रेड्डीवार,नगरसेवक मा.प्रितम गेडाम,मा.नितेश रस्से,मा.गुणवंत सुरमवार
नगरसेविका सौ.पल्लवी ताटकोंडावार,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.कविता मुत्यालवार, जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम, मा.बादल गेडाम,मा.हरिदास हुलके तसेच आदी काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.