भालेश्वर येथे पोलीस पाटील मार्गदर्शक मेळावा व सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार सोहळा संपन्न.


भालेश्वर येथे पोलीस पाटील मार्गदर्शक मेळावा व सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार सोहळा संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : तालुक्यातील भालेश्वर येथे नदीकिनारी असलेल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या व देवस्थानच्या पटांगणात पोलीस पाटील मार्गदर्शन मेळावा तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटलांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघ तालुका शाखा,ब्रह्मपुरी च्या वतीने घेण्यात आला. 



या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मान.उषा चौधरी तहसीलदार, ब्रह्मपुरी या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री अनिलजी जीट्टावार साहेब पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन, ब्रह्मपुरी , अरुण पिसे बीट अंमलदार अ-हेरनवरगाव ,योगेश्वर ठाकरे माजी जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघ, चंद्रपूर, श्री योगेश मते जिल्हाध्यक्ष पोलीस पाटील संघ चंद्रपूर,श्री शरद भागडकर उपसरपंच भालेश्वर 


श्री.निलेश भोयर तालुका अध्यक्ष ब्रह्मपुरी, श्री देवानंद झोडे तालुका उपाध्यक्ष ब्रह्मपुरी, गिरीधर देशमुख तालुका सचिव ब्रह्मपुरी,कृष्णा दिघोरे पोलीस पाटील भालेश्वर,अकुल राऊत पोलीस पाटील अ-हेरनवरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री नारायण जी तिडके पोलीस पाटील चौगान, श्री राजेश्वर नागमोती पोलीस पाटील मालडोंगरी, श्री भगवान मडावी पोलीस पाटील भगवानपूर यांचा सेवानिवृत्ती पर सह पत्नी सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षा तहसीलदार उषा चौधरी,प्रमुख अतिथी पोलीस निरीक्षक अनिल जिट्टावार साहेब यांनी सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.या कार्यक्रमाप्रसंगी कर्तव्य बजावीत असणाऱ्या व सेवानिवृत्त पोलीस पाटलांना मार्गदर्शन केले आणि सेवानिवृत्त पोलीस पाटलांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.


मार्गदर्शन व सेवानिवृत्ती कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृष्णाजी दिघोरे पोलीस पाटील भालेश्वर, अतुल राऊत अ-हेर नवरगाव , यांनी अथक परिश्रम केले तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांनी मोलाचे सहकार्य केले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !