सांस्कृतिक कार्यक्रमातून कौशल्य विकसीत करा.- डॉ.सतिश वारजुकर

सांस्कृतिक कार्यक्रमातून कौशल्य विकसीत करा.- डॉ.सतिश वारजुकर


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपूरी : दिनांक,२७/०१/२४ विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनन्यसाधारण महत्व आहे. विद्यार्थ्यांचे कलागुण जोपासण्याचे व वाढवण्याचे काम सांस्कृतिक कार्यक्रमातून केले जाते. 


अशा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कलेचा वारसा जपून स्वतःचे कौशल्य विकसीत करावे. आताच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकापर्यंतच मर्यादीत न राहता कला-क्रीडा गुणांच्या माध्यमातून कौशल्य विकसीत करावे, असे प्रतिपादन डॉ. सतिश वारजुकर यांनी भालेश्वर येथे  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

        

कार्यक्रमाचे  उदघाटन  राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमुर विधानसभा क्षेत्र डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वामनजी मिसार तालुका अध्यक्ष किसान सेल,काँग्रेस कार्यकर्ते पिंपळगांव गुड्डूभाऊ बगमारे,ग्रामपंचायत सरपंच भालेश्वर सरपंच  संदेश रामटेके,उपसरपंच शरद भागडकर ,ग्रामपंचायत सदस्य राजू पिल्लारे,अमरदीप लोखंडे अ-हेरनवरगाव


धनराजजी मेश्राम,प्रा. मंगेश पाथोडे, प्रकाश डोलारे, अरविंद भुते,पोलीस पाटिल श्रीकृष्ण दिघोरे,नरेश चौधरी,आशिष सहारे, दिलीपजी अलोणे, भूमेश अलोणे, प्रकाश खोब्रागडे, वामनजी दिघोरे, ग्रामपंचायत सदस्य सौ.शुभांगी अलोणे,उपाध्यक्ष सौ.चेतनाताई भागडकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.मनोरमा दिघोरे, सौ.उज्वला भागडकर,नवनीत भागडकर,उपस्थित होते.


सूत्रसंचालन वाट सर,प्रस्तावना मुख्याध्यापक बावनकर सर यांनी तर आभार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल राऊत यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भालेश्वर वाशीय जनतेने एकजुटीने मोलाचे सहकार्य आणि हातभार लावुनकेले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !