चांदापूर शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे शाखेचा उपक्रम. ★ शिवसेना संस्थापक,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमाने संपन्न.

चांदापूर शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे  शाखेचा उपक्रम.


★ शिवसेना संस्थापक,बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध कार्यक्रमाने संपन्न.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : तालुक्यातील चांदापूर येथे दि.23 जानेवारी 2024 रोजी शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांची जयंती निमित्त,मूल तालूका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मूल तालूका संघटक रविंद्र शेरकी यांचे पुढाकाराने चांदापूर शिवसेना शाखेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


सकाळी 11.00.वा.कार्यक्रमाचे उदघाटक, सूनिल भाऊ  मूनगेलवार ,शाम शेरकी निवृत्त पोलिसा उपनिरीक्षक यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला मालारपन करून उदघाटन करण्यात आले  तर विशेष अतिथी म्हणून नंदू बारस्कर सामाजिक कार्यकर्ता,सूधीर गोव्हवर्धन जुनासूरला,माजी सरपंच  गणपती पाल शिवसेना  महीला तालुका प्रमूख सौ.रजनीताई झाडे,प्रवीण भरडकर मूल,भास्कर झरकर,नरेश निमकर, दिवाकर केळझरकर नवनीत  चिंचोलकर उमाकांत शेरकी अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.यावेळी,नंदू बारस्कर,सुनिल भाऊ मूनगेलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


दुपारी,2 वाजता प्रसिद्ध सामाजिक कीर्तनकार परशुराम महाराज पिपरी दिक्षीत यांचे कीर्तनातून सामाजिक प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आला यात भजन मंडळ विरई येथील सुखदेवजी वाढई, व फिसकूटी येथील संगीत वादक यांनी साथ दिली चार वाजता प्रसिद्ध सामाजिक प्रबोधनकार डाॅ.समीर कदम पुसद यांचे  प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले,सायंकाळी सात वाजता शिवसेना संस्थापक,बाळासाहेब ठाकरे यांचे जयंती कार्यक्रम घेण्यात आला.


या प्रसंगी, तालुक्यातील शिवसेना युवा सेना  प्रमुख , रितीक संगमवार, शहर प्रमूख आकाश राव अखिल  भारतीय माळी महासंघ तालूका मूल युवक अध्यक्ष तथा शिवसेना युवा सेना माजी तालुका प्रमुख ओमदेव मोहूरले  शंभर पाटेवार संदिप गिरडकर जुनासूरला पदाधिकारी   गोविंदा नरसपूरे, उप तालुका प्रमुख,नरेश, कोरडे  ग्रा.पं.सदस्य, बाबराळा, विलास लांजेवार चांदापूर ,इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.


या प्रसंगी उपस्थितांना ओमदेव मोहूर्ले यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन तालूका संघटक रविंद्र शेरकी यांनी केले तर आभार प्रशांत वनकर जुनासूरला यांनी मानले हे कार्यक्रम यशस्वी करण्या साठी चांदापूर शाखा प्रमुख जंयेद्र निमकर,दिनेश नागापुरे, आकाश कडूकार, पंकज बोरीकर, सुरज शेरकी,अजिंक्य शेरकी, इत्यादी शिवसैनिकांनी सहकार्य केले.


या कार्यकमाला गावातील, बाहेर गावातील शिवसैनिक, गावातील विद्यार्थी व महीला भगणी,बांधव शेकडो च्या संख्येने उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !