भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथे मकरसंक्रांती उत्सव संपन्न.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : दिनांक,१५/०१/२०२४(अमरदीप लोखंडे सहसंपादक)दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भु-वैकुंठ आत्मनुसाधार अड्याळ टेकडी येथे मकरसंक्रांत मोठया उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आ.सुबोधदादा मार्गदर्शक व संचालक भु-वैकुंठ अड्याळ टेकडी प्रमुख उपस्थित श्री. वैद्य गुरुजी प्रांत सेवाधिकारी वरोरा,श्री.प्रदीप पवार सर,यस प्रकाशन नागपूर,श्री. बाळकृष्णजी हांडे प्रचारक वर्धा,श्री.लालचंदजी नखाते मोखारा,सौ.बेबीताई काकडे, ज्योत्स्नाताई पत्रिकर मध्यप्रदेश,डॉ.निशाताई वैद्य वरोरा इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रकाशन मंडळ अड्याळ टेकडी येथे ग्रामगीता सर या नवीन पुस्तकाचे विमोचन करण्यात आले.वैद्य गुरुजी यांच्या 81 व्या जन्मदिवसानिमित्य डॉ. जगदीशजी वैद्य यांचे कडून भोजनदान करण्यात आले.