युवकांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम म्हणजे नेहरू युवा केंद्र. - प्रकाशकुमार मनुरे ★ नेहरू युवा केंद्र संघटन चे राज्य निर्देश प्रकाशकुमार मनुरे यांची गडचिरोलीत सदिच्छा भेट.प

युवकांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम म्हणजे नेहरू युवा केंद्र. - प्रकाशकुमार मनुरे


★ नेहरू युवा केंद्र संघटन चे राज्य निर्देश प्रकाशकुमार मनुरे यांची गडचिरोलीत सदिच्छा भेट.


एस.के.24 तास


गडचिरोली : नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र व गोवा चे राज्यनिर्देशक प्रकाशकुमार मनुरे हे गडचिरोली येते आदिवासी युवा आदान प्रदान प्रस्थान च्या कार्यक्रमाकरिता गडचिरोली येते आले असता  त्यांनी ने.यु.कें.गडचिरोली च्या जिल्हा कार्यालयास भेट दिली.

युवा स्वयंम सेवकांशी संवाद साधले. यावेळी सोबत अलिबाग चे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला, गडचिरोली चे जिल्हा युवा केंद्र अमित पुंडे उपस्थित होते.राज्य निर्देश प्रकाशकुमार मनुरे यांनी यावेळी नेहरू युवा केंद्र गडचिरोली च्या युवा स्वयंमसेवकांशी संवाद साधले व त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.


नेहरू युवा केंद्र संघटन हे देशातील युवकांचे सर्वात मोठे  संघटन असून त्यामध्यमातुन अनेक युवकांच्या कलागुनांना वाव देण्यात येते आहे, राष्ट्रीय युवा महोत्सव, युवा सांसद, युवा संवाद सारख्या अनेक उपक्रमाच्या माध्यमातून युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता नेहरू युवा केंद्र कार्य करीत असल्याचे मत नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र आणि गोवा चे राज्य निर्देशक प्रकाशकुमार मनुरे यांनी केले.


यावेळी युवा स्वयंमसेवक अनुप कोहळे, सूरज चौधरी, तालुका समन्व्यक, पंकज लाडे, प्रियंका दहिकर, जयश्री प्रधान, सपना लाडे, प्रतीक्षा सिडाम, पूजा नींदेकर, इशिका देठेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कोहळे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !