जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संघटना. ■ अखंड भारत - सावली तालुका तर्फे तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.


जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक मालक सामाजिक संघटना.


अखंड भारत - सावली तालुका तर्फे तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.


एस.के.24 तास


सावली : मा.प्रधानमंत्री,भारत सरकार,मा.गृहमंत्री, भारत सरकार,मा.परिवन मंत्री,भारत सरकार मा.तहसीलदार साहेब तहसिल कार्यालय,सावली व  मा.ठाणेदार साहेब,पोलीस स्टेशन सावली जि.चंद्रपूर हिट अँड रण कायदा रद्द करण्याबाबत नम्रता पूर्वक निवेदन देण्यात आले.


अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पडुन जाणे हे प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखे मुळीच नाही. परंतु स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणी मात्रामध्ये जन्मजात असल्या कारणाने आणि आपल्या भारत देशामध्ये दलीत आणि आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरतूद आहे.


 तशी एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण ड्रायव्हरला नसल्या कारणाने ड्रायव्हर हा केवळ स्वतःच्या जीवाच्या भितीने अपघात स्थळावरून पळुन जातो.करीता ड्रायव्हर सुरक्षा कायद्याची प्रथमत  अमलबजावणी करणे आणि त्यानंतर हिट अँड रण या नविन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करून त्यानंतरच कायदा लागू करणे ही विनंती करण्यात आली.


सदर कायदा रद्द करण्यात यावा अन्यथा दि. ०२/०१/२०२४ रोजी रस्ता रोको आंदोलन हिरापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणार असुन सदर आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून आल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.


निवेदन देताना उपस्थित,उमेश आजबले चंद्रपुर जिल्हा नियोजन प्रमुख,सुधिर टोंगे महाराष्ट्र प्रदेश प्रसार प्रचार प्रमुख,रवि झरकर चंद्रपुर जिल्हा कोषाध्यक्ष,राजु देशमुख  सावली तालुका अध्यक्ष,निलेश वद्देलवार सावली तालुका उपाध्यक्ष,हरी कातलवार सावली तालुका सचिव,सुरज देऊरघरे,एकनाथ ठाकुर,योगेश मोहुर्ले,रोशन मेरुगवार,अमित भोपये,प्रज्वल कोतपल्लीवार,संतोष कस्तुरे,शुभम लेणगुरे,रजनिकांत सोनवाणे,सागर कामटकर,प्रकाश गेडाम तथा सावली तालुका सदस्य उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !