ईव्हीएम मशीन हटाव साठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर आंदोलन.

ईव्हीएम मशीन हटाव साठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर आंदोलन.


एस.के.24 तास


नागपूर : ईव्हीएम मशीन हटाव बॅलेट पेपर लाओ या मागणीसाठी निवडणुक आयोग कार्यालय दिल्ली समोर भव्य मोर्चा व आंदोलन बामसेफ नेते,वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.दोन दिवसा पूर्वी पासुनच संपूर्ण भारतातील बामसेफ व भारत मुक्ती मोर्चा चे असंख्य कार्यकर्ते जंतरमंतर दिल्ली येथे पोहचले.

त्या ठिकाणा वरुन मोर्चा काढण्यात आला ते थेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कार्यालय दिल्ली समोर धडकला ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर नुसार निवडणुका घ्या ,लोकतंत्र बचाव असे नारे देत मोर्च्या चे रुपांतर आंदोलनात झाले.असंख्य कार्यकर्ते एकत्रित गोळा झाल्यामुळे शासनाला पोलीस फोर्स वाढवावा लागला.


 2024 ची निवडणुक ईव्हीएम मशीन द्वारे झाली तर बामसेफ व भारत मुक्ती मोर्च्या चे कार्यकर्ते ईव्हीएम मशीन तोडफोड केल्या शिवाय राहणार नाही असा सुर कार्यकर्त्यांत होता.बामसेफ नेते,वामन मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.सदर मोर्च्यात तुफान गर्दी झाली होती.


 गडचिरोली जिल्ह्यातुन जवळपास दोनसे कार्यकर्त्यांते सहभागी झाले होते असे बामसेफ चे जिल्हाध्यक्ष, भोजराज कान्हेकर यांनी सांगीतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !