संविधानाची आवृत्ती ग्रंथालयाला भेट दिली.
एस.के.24 तास
काटली येथे 24 जानेवारी 2024 प्रजासत्ताक दिनानिमित्त कै.सी.पा. मुनघाटे. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत पी. एम. राऊत सहाय्यक शिक्षक यांनी मुख्याध्यापक श्री एन. आर. मंगर यांच्या हस्ते संविधानाची आवृत्ती ग्रंथालयाला भेट दिली.
विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची जनजागृती व्हावी व आपले मूलभूत अधिकार काय आहे.हेच समजावून सांगितले व नियमित संविधानाचे वाचन करावे व शालेय उपक्रमामध्ये संविधानाचा वाचन करावं या उद्देशाने ग्रंथालयामध्ये संविधानाची आवृत्ती भेट दिली.
या निमित्त उपसरपंच पार्वता ताई खेडेकर परसराम मुनघाटे,देवा भोयर तसेच श्री.कोंटगले सर,वर्दलवार सर,पराते सर,ताटेवार सर, बोधलकर सर,मोहितकर पोटावी शिंपी,आणि गावकरी मंडळी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.