गडचिरोली - चिमूर लोकसभा निवडणूक लढण्याकरीता काँग्रेसकडून इच्छुकांची गर्दी.
एस.के.24 तास
गडचिरोली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे वारे वाहू लागले असतांना सगळे राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीनेही उमेदवार चाचपनीला सुरुवात करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातकरीता काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवाराचे अर्ज मागविले असता 6 ते 9 जानेवारी 2024 पर्यंत ऐकून 9 इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हा काँग्रेस कार्यालय गडचिरोली येते सादर केले असल्याची माहिती गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिली आहे.
इच्छुक उमेदवारांमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ.नामदेव किरसान,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,माजी आमदार,आनंदराव गेडाम,प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते,माजी जि.प.सदस्य नंदू नरोटे, निलेंज मरस्कोल्हे,युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. प्रणित जांभुळे,नारायन जांभुळे,हरिदास बारेकर यांनी आपला अर्ज जिल्हाध्यक्ष,महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या मार्फतीने पक्षश्रेष्टी कडे सादर केला आहे.