तीस फूट उंच झाडावर आढळला मृत बिबट्या ; हृदय घाताने मृत्यू झाल्याची शक्यता. ★ ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील.

तीस फूट उंच झाडावर आढळला मृत बिबट्या ; हृदय घाताने मृत्यू झाल्याची शक्यता.


★ ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील.


एस.के.24 तास


नागभीड : ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रातील तळोधी नीयतक्षेत्रात एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली.हृदय घाताने बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. झाडावर तीस फूट उंचीवर बिबट्याचा मृत्यू झाला आहे.तळोदी बाळापुरचे वन कर्मचारी हे सकाळी कॅमेरा ट्रॅपचे फोटो तपासायला गेले. 


परिसरात दुर्गंधी आल्यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली असता तळोदी गांगलवाडी रस्त्याच्या लगतच महसूल विभागाचे गट क्रमांक ६४ मध्ये ४० ते ४५ फूट उंची च्या बेहड्याच्या झाडावर ३० फूट उंचीवर एका फांदीवर बिबट मृतावस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती तळोधी बाळापुरचे वन अधिकारी,अरुण कन्नमवार यांना देण्यात आली.माहिती मिळतात घटनास्थळी जाऊन दोराच्या साह्याने झाडावर चढून बिबट्याचा मृतदेह खाली उतरविला.


मृत बिबट्या साडेतीन ते चार वर्षे वयाचा मादा असल्याचे लक्षात आले.बिबट्याचा मृत्यू पाच ते सहा दिवसापूर्वी झाला असावा,असा अंदाज आहे.ज्या झाडावर हा बिबट मृत होता त्या झाडाखाली वाघाने ओरबडल्याच्या खुणा आहे.झाडावर थोड्या उंचावर पर्यंत वाघाच्याही पंजाचे नखांचे निशाण आढळून आले.


त्यावरून वाघाने पाठलाग केल्यामुळे बिबट झाडावर घाई  घाईने चढला व चढल्यानंतर हृदय हाताने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला.पंचनामा केल्या नंतर शवविच्छेदना साठी ब्रह्मपुरी वन विभागाच्या कार्यालयात पाठविण्यात आले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !