जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेर नवरगाव येथे बाल मेळावा व हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२०/०१/२४ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक तथा शाळा व्यवस्थापन समिती यांनी दिनांक २२ जानेवारी २४ ला सकाळी ठीक १०-३० वाजता बाल मेळावा च्या माध्यमातून विद्यार्थ्यांची खरी कमाई आणि गावातील महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
बालमेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले पदार्थ विक्रीसाठी विद्यार्थी विद्यालयाच्या पटांगणात मांडणार असुन विद्यार्थ्यांनी मांडलेले पदार्थ जास्तीत जास्त पालकांनी विकत घेऊन विद्यार्थ्यांना खरी कमाई काय असते याचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा.तसेच गावातील महिलांना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला या उखाण्याच्या मनी चा उदात्त हेतू बाळगून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे दुपारी ठीक २-०० वाजता आयोजन करण्यात आलेले आहे.
या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा आणि एकमेका कुटुंबाप्रती स्नेहभाव आपुलकी तयार करावी असे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देवानंद तुरकाने तथा शिक्षक- शिक्षिका यांनी केले आहे.