लोकमान्य टिळक उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथे भारत स्काऊट आणी गाईड तर्फे आनंद मेळाव्याचे आयोजन .
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक, १/१/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) नववर्षाचे औचित्य साधून लोकमान्य टिळक विद्यालयातील भारत स्काऊट गाईड राजु मंच आणि मिना मंच तर्फे विदयालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतीमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पणाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री विलास धोंगडे सर होते,उपप्राचार्य श्री,रवी पेशटटीवार सर,पर्यवेक्षीका सौ,प्राजक्ता चिंचाळकर मॅडम, श्री विवेक बिटपल्लीवार सर,कु.जयश्री चामाटे मॅडम,श्री पराग भांडारकर सर,सौ,प्रतीभा शीऊरकर,यांची मंचावर उपस्थीती होती.
कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री विलास धोंगडे सर यांनी विदयार्थ्यांना व्यवसाय करण्याबाबत मार्गदर्शन केले.आनंद मेळाव्या मध्ये मिडलस्कुलच्या विदयार्थ्यांनी विवीध खादय पदार्थ्यांचे स्टॉल लावले व खादयपदार्थाची विक्री करुन व्यवसाय केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कु.विदया कोडापे मॅडम यांनी केले.कार्यक्रमा च्या यशस्वीतासाठी शिक्षक/शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परीश्रम घेतले.