विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन साजरा.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,०५/०१/२३ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक.)विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन' म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एम. बी. धोटे सर यांनी प्रमुख पाहुणे श्री. एम. व्ही. खरकाटे सर, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन तथा माल्यार्पण करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे संचालन कु.टि.एन.धोटे मॅडम यांनी केले तर आभार श्री.जी.एम.मेश्राम सर यांनी मानले.
कार्यक्रमाचे औचित्य साधुन विद्यालयीन विद्यार्थ्याच्या वकृत्व स्पर्धा, निंबध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. सदर कार्यक्रमात शिक्षकांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम. बी. धोटे सर यांनी विविध स्पर्धांचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले.