महाराष्ट्र शिक्षण परिषदेत ची संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.

महाराष्ट्र शिक्षण परिषदेत ची संगणक प्रयोगशाळा व्यवस्थापन मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : महाराष्ट्र शिक्षण परिषद मुंबई,च्या अनुषंगाने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना आधुनिक युगामध्ये शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी आय.सी.टी.उपक्रमाद्वारे डिजिटल साधनाचा योग्य तर्हेने वापर करता यावा. यासाठी प्राथमिक शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळाची उभारणी करून देण्यात आली.



 त्या संगणक प्रयोगशाळावर नेमण्यात आलेल्या प्रशिक्षकांना नागपूर येथे एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले.सदरील प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशेळेस श्री. सचिन जगताप सर शिक्षणाधिकारी जिल्हा वर्धा,श्री.वीरेंद्र गौतम सर समग्र शिक्षा अभियान जिल्हा समन्वयक भंडारा हे उपस्थित होते. 


तसेच श्री.राजकुमार हिव्हारे सर शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्ह्याचे सर्व संगणक प्रशिक्षक प्रशिक्षण स्थळी उपस्थित होते.प्रशिक्षक म्हणून प्रफुल बारेकर सर उपस्थित होते. सदर प्रशिक्षण दिनांक 22/01/2024 रोज सोमवार ला संपन्न झाले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !