■ गडचिरोली कास्ट भांडार समोर नागरिक हैराण.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली वनविभाग कास्ट भांडार चांदाळा रोड गडचिरोली येथुन जळावू लाकडे नेण्याकरीता नागरिकांनी एकच गर्दी केली असुन लाकडे नेण्याकरीता दोन-दोन दिवश लागत असल्यामुळे नागरिकही हैराण झाले आहेत.गडचिरोली कास्ट भांडार येथे सहा - सहा महिणे जळावू लाकडे मिळत नाही.
लाकडाचा नेहमीच तुटवडा असतो. दि. १० जानेवारीला लाकडे आलीत म्हणुन नागरिकांना माहीती होताच थंडीच्या दिवसांत सरपण मिळावे म्हणुन गोरगरीब जनता लाकडे विकत घेण्याकरीता तोबा गर्दी केली.असता पहिला दिवश कार्ड ची झेरॉक्स देणे दुसऱ्या दिवशी 300 रुपये भरणे व तिसर्या दिवशी लाकडे नेणे म्हणजे 300 रुपये एक बिट , पोहचता करण्याकरिता 300 रुपये दोन दिवसाची रोजी ६०० रुपये म्हणजे एक बिट लाकडासाठी १२०० रुपये खर्च येतो. सदर बाब गोरगरीबांना परवडणारी नाही.
उलट उज्वला गॅस स्वस्ती म्हणण्याची वेळ आली. कारण जंगलव्याप्त जिल्हयात गोरगरीबांना लाकडे मिळेणासे झाले आहे.सहा - सहा महिने वाट बघावी लागतो. तरी डी.एफ.ओ.गडचिरोली यांनी सदर बाबीकडे लक्ष पुरवून लाकडाचा पुरवठा करावा.व गोरगरीबावरील अन्याय दुर करावा. सदर वनविभागात फक्त मरणाला व पत्रिके नुसार कार्यक्रमालाच लाकडाचा पुरवठा करतांना दिसतो.