ब्रम्हपुरी येथे ट्रक च्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू.

ब्रम्हपुरी येथे ट्रक च्या धडकेत विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०१/२४ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक)नेहमी प्रमाणे कॉलेज मध्ये जात असताना नेवजाबाई हितकारणी महाविद्यालया समोर धान्य भरलेल्या ट्रकने सायकलला धक्का दिल्याने सायकल स्वार विद्यार्थिनी खाली पडून ट्रक मध्ये सापडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळ जनक घटना आज ब्रह्मपुरी मध्ये सकाळी 10:30 ते 11:00 च्या सुमारास घडली.


मृतक मुलीचे नाव समीक्षा संतोष चहांदे असून वय वर्ष १७ राहणार मालडोंगरीची रहिवासी आहे.


मृतक मुलगी ही दररोज मालडोंगरी या गावावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे जाणे येणे करून  अकराव्या वर्गात शिक्षण घेत होती.नेहमीप्रमाणे आज ती कॉलेजमध्ये जात असताना धान्याने भरलेल्या ट्रकने तिच्या सायकल ला मागेहुन धक्का दिला त्या धक्क्यामुळे ती जमिनीवर पडून ट्रकच्या चाकात सापडलली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.


ज्या जागी तिचा मृत्यू झाला ती जागा खूपच अडचणीची असल्याचे जाणवते.नगरपरिषदेने बांधलेले गाडे हे भाडेपट्टीने दिलेले आहेत.


गाडे धारकांनी टिनाचे शेड उभे करून रस्त्यावरअतिक्रमण केल्याचे तसेच मुरमाचे ढिगारे टाकून उंचवटा तयार केल्यामुळे रहदारी साठी अडचण होत असल्याचे जाणवते.समीक्षा च्या पश्चात आई, वडील,बहिण ,भाऊ असा छोटासा परिवार असुन खूप मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे तिच्या मृत्यूमुळे गावात खूपच हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !