जंगलात गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू ; चंद्रपूरच्या कारवा वनक्षेत्रातील घटना.
एस.के.24 तास
चंद्रपूर : चांदा वनपरिक्षेत्रातील कारवा राखीव वनक्षेत्रात जळावू लाकडे (सरपण) गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केले. ही घटना रविवारी दुपारी उघडकीस आली.शामराव रामचंद्र तिडसुरवार रा.बल्लारपूर असे मृताचे नाव आहे.या घटने मुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.मृताच्या कुटुंबीयांना अंत्यसंस्कारासाठी २५ हजारांची आर्थिक मदत वनविभागाकडून करण्यात आली आहे.पुढील तपास सुरू आहे.