संत तुकाराम महाराज जन्मोत्सव व स्नेहमिलन सोहळा २ फरवरी गडचिरोलीत.
एस.के.24 तास
गडचिरोली : जगतगुरू संत तुकाराम जन्मोत्सव सोहळा व कुनबी समाजाचा स्नेहमिलन सोहळा 2 फरवरी २०२४ ला कुनबी समाज भवनाची नियोजीत जागा कॉर्मेल हायस्कूल चे मागे गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
कुनबी समाज बांधव एकत्रीत आला पाहीजे.मराठा कुनबी कसा यावरही विचार मंथन होणार आहे. कार्यक्रमात प्रा.पुनित मातकर डायट गडचिरोली , सुर्यकांत पिदुरकर मुख्याधिकारी न.प.गडचिरोली , साहिल झरकर उपविभागीय पोलीस अधिकारी गडचिरोली आदिचे मार्गदर्शन लाभणार आहे.
सदर कार्यक्रमात रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी,महिला करीता हळदीकुंकू कार्यक्रम भजन संध्या व स्नेह भोजनाचा कार्यक्रम असुन सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील कुणबी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुणबी समाज सेवा समिती जिल्हा गडचिरोली च्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे.