जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,अ-हेरनवरगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन साजरा.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी : दिनांक,०४/०१/२४(अमरदीप लोखंडे, सहसंपादक)जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अ-हेरनवरगाव येथे क्रांतीज्योती, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती तथा बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष देवानंद तुरकाने यांनी सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमे समोर दिपप्रज्वलन केले.आणि प्रतिमेला माल्यार्पण करूनअभिवादन केले. शाळेतील शिक्षक सोमेश्वर खरकाटे सर, शिक्षिका प्रियंका निकुरे ,रवीना कुथे,तथा विद्यार्थी , विद्यार्थिनी यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथीशाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. पुनम सतीश ठेंगरे यांनी शाळेतील विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतुक केले आणि सावित्रीबाई फुले , जिजामाता यांच्यासारख्या कार्यशील, कृतिशील आणि सुसंस्कारित बनण्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून संदेश देऊन मुलींना शुभेच्छा दिल्या.
बालिका दिनाचे औचित्य साधून रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच अनेक मुली सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शाळेमध्ये आल्या होत्या.शाळेतील पोषण आहार शिजविणाऱ्या सौ,लक्ष्मी जराते व त्यांच्या मदतनीस त्यांचा यावेळी मुख्याध्यापक तुरकाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.