ग्रामपंचायत नवेगाव पांडव येथे सावित्रीबाई फुले जयंती.
एस.के.24 तास
नागभीड : एकोणिसाव्या शतकात भारतात सर्वप्रथम महीलांसाठी शाळा सुरू करून या देशात शिक्षणरूपी गंगा प्रत्येकाच्या दारात नेऊन पोहचवणाऱ्या सवित्रीआई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत पांडव येथे करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन नवेगाव पांडव येथील सरपंच अँड.शर्मिला रामटेके हे उपस्थित होते.
आपल्या प्रास्ताविक व अध्यक्षकीय भाषणात ॲड.शर्मिला रामटेके यांनी सावित्रीबाईंचा गुणगौरव करताना सावित्रीबाई फुले यांनी त्याकाळी मनुवादी पुरुषी छाताडावर पाय देऊन सामोरं जात शाळा सुरू करून इथल्या मुलींना शिकवले व फार मोलाचे कार्य केले असे सांगितले .आज स्त्रीचे आयुष्य हे खडतर आहे.आजही स्त्रियांवर खोटे खोटे आरोप लावले जातात . कोणता ही आरोप सिद्ध करू शकले नाही तर स्त्रियांच्या चारित्र्यावर बोटं ठेवन्याची परंपरा पाडली जाते असे सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवदास बुल्ले , राजश्री झाडे, विद्या मेश्राम हे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकत सध्याच्या परिस्थिती मध्ये सावित्री फुले यांना समजून घेणे आवश्यक आहे असे सांगितले.
याच दिवसांचे औचित्य साधून आकाश सोंडवले,आर.एफ ओ.नागभिड आणि मा.राजश्री झाडें मैडम यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात केला व ज्या गावकर्यांनी त्यांचे २०२३ ते २०२४ पर्यंत गृहकर, पाणी कर भरलेला आहे. त्यांना ग्रामपंचायत कडून १५ लिटर पाण्याची कॅन देण्यात आल्या . हयां कार्यक्रमाला .विजय जी बोरकुटे उपसरपंच ,माजी बंसिधर चूर्हे ,.शारदाताई वासुदेव नवघडे,रितेश राजेश्वर पांडव,निरंजना सोनटक्के,मिलती केवळ तिजारे,कल्पना सुरेश नवघडे.देवकन्या पांडव,ने.ही. विद्यालयाचे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे शिक्षक वृंद
व विध्यार्थींनी व विध्यार्थी गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन नेवजाबाई हितकरिनी विद्यालय नवेगाव पांडव चे शिक्षक सतिश डांगे यांनी केले तर आभार प्रर्दशन रितेश पांडव यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.विजय श्रीराम नवघडे, श्री. अतुल दादाजी पांडव यांनी परिश्रम घेतले.