चंद्रपूर येथे रिपब्लिकन चा राज्यस्तरीय अधिवेशन.
एस.के.24 तास
सावली : रीप्बलीकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशन आणि संविधान बचाव – देश बचाव या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन रविवार दि.७ जानेवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह, नागपूर रोड चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. या अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र गवई राष्ट्रीय सरचिटणीस रिपाई, तर उदघाटक सुबोध वाघमोडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपाई, स्वागताध्यक्ष चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली होती. संविधानाने निर्माण केलेल्या न्याय, समता, स्वातंत्र्यता, बंधुता या मुल्यांची प्रस्थापना करून या मुल्यांवर आधारित समज निर्मिती करणे हा आहे. परंतु अलीकडे संविधानात बदल करण्याचे षडयंत्र सत्ताधार्याकडून रचले जात आहे.
संविधानाला धोका निर्माण झाला आहे, हे संविधान वाचविणे काळाची गरज असून “ संविधान बचाव – देश बचाव ” याची जनजागृती नागरिकामध्ये करणे हा अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. सदर कार्यक्रमकरीता जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, बाजीराव उंदिरवाडे,कार्याध्यक्ष लाजर कांबळे, मोरेश्वर चंदनखेडे,सिद्धार्थ सुमन,कोमल रामटेके,देशकुमार खोब्रागडे,रमेश जीवने, तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.