विरूर स्टे.येथे ४० गरजुंना ब्लॅंकेटचे वितरण : ग्राम फलकाचे अनावरण.

विरूर स्टे.येथे ४० गरजुंना ब्लॅंकेटचे वितरण : ग्राम फलकाचे अनावरण.


एस.के.24 तास


राजुरा : आदर्श श्रीगुरुदेव सेवा भजन मंडळ विरूर (स्टेशन) आणि समस्त ग्रामवासीय जनतेच्या सहकार्यांने  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विदर्भस्तरीय खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  बाजार चौकात झालेल्या  या भजन स्पर्धेचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते झाले.अध्यक्षस्थानी पो.स्टे.विरूरचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल होते .

   

केंद्रीय प्रचार समिती सदस्य ॲड.राजेंद्र जेनेकर,माजी सैनिक मनोज ठेंगणे,  लटारू मत्ते, सरपंच अनिल आलाम,  उपसरपंच सौ. प्रीतीताई  पवार,सुभाष पावडे,माजी जि. प. सदस्य अविनाश जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रभाकर ढवस, सरिता अजय रेड्डी, सुरेश पावडे, भीमराव पाला,अजय रेड्डी, भास्कर सिडाम,मनोज सारडा,तिरुपती नल्लाल्ला ,सचिन उलमाले, मुख्याध्यापक वडगावकर, 


मुख्याध्यापक रामचंद्र पाला,आबाजी  ढुमणे,डाॅ.उमप,रुंदा पेंदोर,सुनिल गोरे,संजय उमरे,सुनिता इग्रपवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आशिष पावडे यांच्या स्मरणार्थ पावडे परिवाराचे वतीने ४० गरजुंना ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले तसेच गावाच्या सुरूवातीला ग्राम फलकाचे अनावरण करण्यात आले.  राष्ट्रसंतांनी रचलेली भजने म्हणजे नित्यनूतन स्फूर्तीचा अखंड झरा असून ती समाजाला सदैव मार्गदर्शन करीत असतात. 


भजन स्पर्धेच्या माध्यमातून लोकशिक्षण आणि ग्राम संस्कृती जतन करण्याचे  कार्य होत असल्याचे ते म्हणाले. ठाणेदार निर्मल यांनी मंडळाच्या आजवरच्या कार्याचे कौतुक करून मंडळानी युवा वर्गांना तंबाखू दारू या सारख्या व्यसनांपासून दूर करण्याचे कार्य हाती घ्यावे,असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.ॲड.राजेंद्र जेनेकर , मत्ते  गुरूजी आदींनी विचार व्यक्त केले. तर समाजसेवी मनोज ठेंगणे यांनी गावातील युवकांना बलवान,आरोग्यवान  होण्याचे आवाहन करून  ग्रामविकासासाठी शेतीपूरक व्यवसायावर जोर देण्याविषयी विचार मांडले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ठमके यांनी केले तर  आभारप्रदर्शन राकेश कडूकर यांनी केले.मंडळाचे देविदास खोबरे,प्रवीण चिडे,मंगेश पावडे,उमेश मोरे, प्रीतम राऊत,वामन ठमके,भूषण कडूकर,संगेश पावडे, विलास आक्केवार,नामदेव चिडे,दिनेश आत्राम आदी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !