नांदगाव - कन्हाळगाव नहराच्या भोंग्यात लपून बसलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद ; पाहणाऱ्यांची अफाट गर्दी.

नांदगाव - कन्हाळगाव नहराच्या भोंग्यात लपून बसलेल्या बिबट्याला वन विभागाने केले जेरबंद ; पाहणाऱ्यांची अफाट गर्दी.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,१०/०१/२४(अमरदीप लोखंडे, सहसंपादक) ब्रह्मपुरी तालुक्यात अ-हेरनवरगाव ,पिंपळगाव, नांदगाव ,कन्हाळगाव या परिसरात भीतीचे वातावरण पसरविणाऱ्रा बिबट्या नांदगाव ते कन्हाळगाव शेतशिवारात नहराच्या शेतीला पाणी सोडणाऱ्या लहान भोंग्यामध्ये जाताना नहरा लगत असलेल्या शेतकऱ्याने पाहिले.

त्यांने गावामध्ये येऊन शेतकरी व इतर लोकांना सांगितले असता लोकांनी बिबट्या लपून असलेल्या भोंग्याकडे धाव घेतली आणि त्या भोंग्याचे तोंड सिमेंट च्या रिकाम्या थैल्या,रिकामे पोते यांच्या साह्याने बंद करून ठेवले.लगेच त्यांनी वनविभाग ब्रह्मपुरी ला फोन करून याची माहिती दिली असता वन विभागाचेअधिकारी श्री सेमसकर साहेब आपल्या ताफ्यासह  घटनास्थळी दाखल झाले.


बिबट्या लपून असलेल्या परिसराची पाहणी करून  बिबट्याला पकडण्यासाठी घटनास्थळी पिंजरा बोलाविला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातिल आबाल, वृद्धांची अफाट गर्दी जमली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी ब्रह्मपुरी पोलीस प्रशासनाला याची माहिती देऊन घटनास्थळी पोलिसाची कुमक बोलाविली.पोलिसांनी शांततेने वनविभागाला सहकार्य करण्याचे जनतेला आव्हान करून घटनास्थळापासून लोकांना दूर जाण्याची सूचना केली असता लोकांनी घटना  स्थळा पासून आपापल्या घराची वाट धरली तर कोणी दुरूनच बिबट्याला कसे पकडतात ते पाहण्यासाठी थांबले.


त्यानंतर वनविभागाने पिंजरा लावून परिसरात दहशत माजविणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले.बिबट्या जेरबंद झाल्याचे पाहून परिसरातील शेतकर्यांनी सुटकेचा निस्वास सोडला.आज पर्यंत आम्ही घाबरत घाबरत शेती वरती जाऊन शेतीचे कामे करत होतो.आता आमचा धोका टळला आणि आम्ही जोमात आपल्या शेतीचे कामे करू असा त्या परिसरातील शेतक -यांनी आपला मनोदय बोलून दाखविला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !