शुभम क-हाडे यांचा अभिनंदन कार्यक्रम थाटात संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१९/०१/२४ तालुक्यातील अ-हेर नवरगाव या खेडेगावात जन्म घेऊन क्रमाक्रमाने प्राथमिक शिक्षणाची एक एक पायरी ओलांडून उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण ब्रह्मपुरी या तालुक्याच्या ठिकाणी घेऊन बीएससी पदवी फरगुशन कॉलेज पुणे,पदव्युत्तर अभ्यासक्रम पुदुचेरी विद्यापीठ आणि एम टेक आयआयटी खडकपूर या नामांकित कॉलेजमध्ये घेऊन यूपीएससीची भूगर्भ शास्त्रज्ञ ही परीक्षा उत्तीर्ण करून शुभम दिलीप क-हाडे यांनी होत्याचे नव्हते करून दाखविले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
त्याने मिळविलेल्या दैदीप्यमान यशाबद्दल त्याचा अभिनंदनचा कार्यक्रम वडील दिलिप क-हाडे सेवानिवृत्त शिक्षक,आई ज्योती क-हाडे आश्रम शाळा मुख्याध्यापिका ,मार्गदर्शक डायटचे माजी प्राचार्य शरदचंद्र ठेंगरे पाटील आणि मित्रपरिवार यांनी त झाडे मीटिंग हॉल ब्रह्मपुरी या ठिकाणी आयोजित केला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य जगनाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली शुभम क-हाडे यांचा जीवनपट सांगण्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून एडवोकेट गोविंदराव भेंडारकर, प्राध्यापक दिगांबर पारधी, प्राध्यापक अनिल कोडापे, राकेश क-हाडे माजी नगरसेवक, ब्रह्मपुरी सहारे गुरुजी आणि त्याला शिक्षणाची योग्य वाट धरायला लावणारे त्यांचे मार्गदर्शक शिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते.अभिनंदन कार्यक्रमात सेकंड इनिंग या व्हाट्सअप ग्रुपचे ग्रुप ॲडमिन तथा मेंबर हे आवर्जून उपस्थित होते.
शुभमच्या यूपीएससी परीक्षेमध्ये मिळालेल्या यशाबद्दल त्याचा मित्रपरिवार,नातेवाईक,स्नेही मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्याचा अभिनंदन केला आणि पुढे सतत जीवनात हार न मानता शेवटच्या क्षणापर्यंत युपीएससीची परीक्षा देत रहा अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी डायट प्राचार्य शरदचंद्र ठेंगरे पाटील यांनी केले तर आभार शुभम तथा वडील दिलीप क-हाडे यांनी उपस्थित आमचे मानले.