महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे नवंवर्ष व सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम थाटात संपन्न.

महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे नवंवर्ष व सावित्रीबाई फुले जयंती चे औचित्य साधून स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम थाटात संपन्न.


एस.के.24 तास


ब्रह्मपुरी : दिनांक,०६/०१/२३ (अमरदीप लोखंडे - सहसंपादक) नववर्ष आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन यांचे औचित्य साधून महाराष्ट्र विद्यालय पिंपळगाव भोसले येथे  स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन श्री सुरेश दुनेदार सरपंच ग्रामपंचायत पिंपळगाव यांचे हस्ते,सौ.विमलताई नरहरी क-हाडे संस्थाध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ, पिंपळगाव भोसले यांचे अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी श्री,ओमप्रकाश बगमारे मुख्याध्यापक म.वि.पिंपळगाव,संस्था सदस्य श्री केशवराव टिकले, श्री प्रवीण क-हाडे सर तथा जितेंद्र कुथे उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ,श्री.अंबर फुलबांधे सहसचिव शिक्षक पालक संघ श्री.गिरीधर देशमुख पोलीस पाटील सोंदरी, श्री निखिल लोंढे पोलीस पाटील पिंपळगाव,अक्षय लोंढे अध्यक्ष तंटामुक्ती समिती, श्री इन्कने सर मुख्याध्यापक जि.प.शाळा पिंपळगाव,श्री मस्के सर, श्री महाले सर,श्री घ्यार सर उपस्थित होते. 


विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी, विविध कौशल्ये विकसित व्हावे, त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, खेळा प्रती आवड निर्माण व्हावी याकरिता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, बौद्धिक स्पर्धा व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. 


या स्पर्धा पार पाडण्यासाठी श्री सचिन क-हाडे सर,श्री सडमाके सर,श्री,नाकाडे सर,श्री गावकर सर, तोडे मॅडम,श्री मेश्राम सर यांनी अथक परिश्रम घेतले तसेच शालेय मंत्रिमंडळ, स्वयंसेवक विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले. गावातील पालक वर्ग यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहुन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंशुल राऊत मॅडम तथा आभार श्री आर.टि.पुरी सर यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !