रामपुरी टोली (येवली)जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : दिनांक,26/01/2024 शुक्रवार ला गडचिरोली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,रामपुरी टोली (येवली) येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष,मोरेश्वर भांडेकर होते.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री.खेमदेव चौधरी,सुनिल गोवर्धन,भाऊराव वाटगुरे,चंद्रभान भांडेकर,राजेंद्र भांडेकर,दुमाजी मेश्राम, धनराज कुनघाडकर,संदीप भांडेकर,जनार्धन गोरडवार,किशोर वाटगुरे,संतोष भांडेकर,हरिदास कुनघाडकर,पुरुषोत्तम हुलके,पंकज कुणघाडकर व महिलावर्गातून,सौ,रंजना सोमनकर,सौ,मनिषा भांडेकर,सौ,जोशना चौधरी,सौ,कोमल भांडेकर, सौ,वर्षा वाटगुरे,समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.
शाळेचे मुख्याध्यापिका,श्रीमती,प्रिती भंडागे सहाय्यक शिक्षिका,विभा जांगधुर्वे यांनी प्रास्ताविक सादर करून शाळेच्या प्रगतीची माहिती दिली.
अनेक विद्यार्थ्यानी भाषणे सादर केली,माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, खेमदेव चौधरी यांनी स्वच्छता विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच श्री.सुनिल गोवर्धन यांनी प्रजासत्ताक दिन व संविधान या विषयावर मार्गदर्शन केले.
गावामध्ये प्रभातफेरी काढून शाळेमध्ये अनेक विद्यार्थ्यानी देशभक्ति पर गीतावर नृत्य सादर केले. तसेच लहान मुलांनी मनोवेधक मनोरे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे संचालन,सहाय्यक शिक्षिका,विभा जांगधुर्वे यांनी केले तर आभार प्रदर्शन,श्रीमती,प्रिती भंडागे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी,सर्व शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी व गावातील युवावर्ग,पालकवर्गाची बहुसंख्येने उपस्थिती होती.ग्रामस्थांनी मेहनत घेतली.