दिल्ली येथे लाल किल्ल्यावर ध्वजारोहण उपस्थित राहण्याचा मान ठाणेगाव येथील भांडेकर दांपत्यांना.
एस.के.24 तास
आरमोरी : तालुक्यातील ठाणेगाव येथील श्री. गोपाल भांडेकर आणि स्नेहलता गोपाल भांडेकर या जोडप्यांना 26 जानेवारी निमित्त लाल किल्ल्यावर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मान मिळाला असून ते दिल्लीला रवाना झालेले आहेत.
सविस्तर वृत्त असे की उज्वला गॅस कनेक्शन च्या अंतर्गत सुधा गॅस एजन्सी च्या आरमोरी च्या माध्यमातून उज्वला गॅस चे ग्राहक श्री,गोपाल भांडेकर व त्यांच्या पत्नी,सौ स्नेहलता भांडेकर यांना यावर्षी 26 जानेवारी 2024 ला दिल्ली येथील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण च्या वेळीस उपस्थित राहण्याचा मान गडचिरोली जिल्ह्यातून प्रथमता मिळालेला आहे.
या सोबतच सायंकाळी ते भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या सोबत भोजनाचा आस्वाद घेणार आहेत अतिशय ग्रामीण भागातून भारत गॅस चे हे ग्राहक असून या दोघांनाही दिल्लीला रवाना होण्यासाठीचे निमंत्रण पत्र मिळालेले आहे त्यानुसार काल दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी रेल्वेने हे जोडपे दिल्लीला रवाना झालेले आहेत.
जिल्ह्यातील ठाणेगाव येथील भांडेकर यांना मिळालेला हा बहुमान असल्यामुळे सुधा गॅस एजन्सी चे संचालक श्रीमती,सुधाताई चंदनखेडे श्री.प्रदीप हजारे श्री विनोद हजारे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ठाणेगाव येथील व परिसरातील जनतेने गोपाल भांडेकर व त्यांच्या पत्नी स्नेहा भांडेकर यांना शुभेच्छा दिलेले आहेत.