पालकमंत्री गडचिरोली चे मात्र नियोजन बैठक नागपुरात.
■ फडणवीस जिल्ह्याचे पालक की मालक ? - महेंद्र ब्राह्मणवाडे यांचा सवाल.
एस.के.24 तास
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, मागील अनेक महिन्यापासून फडणवीसांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतलेली नाही. काँग्रेस पक्षाच्या वतीने वारंवार आंदोलन आणि निवेदनाच्या माध्यमातून देवेन्द्र फडणवीस यांना नियोजन समितीची बैठक घेण्याची मागणी केली.
मात्र ही बैठक गडचिरोली येते न घेता त्यांनी नागपुरात घेतली.
राज्याचे उपमुख्यमंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने जिल्ह्यात नवीन विकासात्मक प्रकल्प उभे राहतील, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊन अनेक युवकांना रोजगार मिळेल, शेतकऱ्यांना 24 तास वीज मिळेल, शेत मालाला योग्य भाव मिळेल, जिल्ह्यात वाघ आणि हत्तीचा धुमाकूळ आहे त्यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याकरीता नियोजन करण्यात येईल, जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था धूळ खात पडली असताना पालकमंत्री जिल्ह्यात येऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतील अश्या अनेक नव्या आश्या सर्वसामान्य नागरिकांच्या पल्लवीत झाल्या असताना उपमुख्यमंत्र्यांनी अनेक महिन्यानंत्तर जिल्हा नियोजन समितीची बैठक गडचिरोली येते न घेता नागपूर येते घेतली.
जिल्ह्यात न येता जिल्ह्याचे नियोजन नागपुरातून करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे, येथील शेतकरी, महिला आणि युवकांचे दुःख कळले असेल काय? जिल्ह्यातील अनेक युवक, शेतकरी महिला आपल्या समस्यान घेऊन नियोजन समितीची बैठक गडचिरोली येते होईल, पालकमंत्री आपल्या समस्यांवर तोडगा काढतील या आशेवर गडचिरोली येते आले मात्र जिल्ह्यातील लोकांच्या समस्या समजून न घेता उपमुख्यमंत्र्यांनी काय नियोजन केले ? का.
फक्त आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बैठक फडणविसानी घेतली,फडणवीस हे जिल्ह्याचे पालक आहेत की मालक आहेत असा सवाल उपस्थित करत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पालकमंत्री आणि स्थानीक लोकप्रतिनिधीचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध केला आहे.